Home वरोरा खरिपाच्या तोंडावर महागाईचा आगडोंब,… बळीराजा मेटाकुटीला.

खरिपाच्या तोंडावर महागाईचा आगडोंब,… बळीराजा मेटाकुटीला.

 

जीवनावश्यक वस्तूसह इंधन दरवाढीचा शेती व्यवसायाला फटका.

खाबांडा
मनोहर खिरटकर

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे महागडे झाले आहेत. महागाईची झळ शेतीव्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसली असुन जीवनावश्यक व इंधन दरवाढीमुळे मजुरीबरोबरच औषधे, बि बियाणे तसेंच यांत्रिक मशागतीच्या कामाचे दरही वाढले आहेत त्यामुळे भाजीपाला व अन्नधान्याचे दरही कडाडले मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही हे भीषण वास्तव समोर येत आहेत.
. मागील काही दिवसामध्ये जिवनावश्यक वस्तू, गँस,इंधन दरवाढीचा फटका शेती व्यवसायाला बसला आणि वाढत्या महागाई मुळे शेतमजुरीचे दर वाढले तर चांगले उत्पादन घेण्यासाठी वापर होत असलेल्या किटकनाशक, तननाशक, बि बियाणे किंमतीत मोठी वाढ झाली. तसेच शेतीच्या पुर्व मशागतीसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. जिल्ह्यात पेट्रोल श़भर तर डिझेलचे दरहि शंभरीजवळ पोहोचले आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शेतमाल वाहतूक किंवा यात्रिकरणावरील शेतीच्या कामाना आर्थिक झळ बसत आहे, सध्या सर्वत्र खरिपाच्या हंगामाची धा़दल उडाली आहे, सुरुच्या हंगामात हळद लावणे, वखरणी, भरलावणी कामे सुरु आहेत, सोयाबीन, कापुस लागवडीसाठी पुर्व मशागतीची कामे सुरु आहे हि सर्व कामे पुर्ण झालेल्या शेतकऱ्यांची खरीपाची चागली पिके येण्यासाठी नांगरणी कलटी ,पंजी ,रोटवेटर, वखरणीचे कामे सुरु आहेत. हि सर्व कामे ट्रकटर च्या साहाय्याने होत असल्याने त्यासाठी बळीराजाला ज्यादा पैसे मोजावे लागत आहेत. रब्बीतील माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्यासाठी वाहतूक दरातहि वाढ झाल्याने त्याची झळ मात्र शेती व्यवसायाला बसत आहे. मृगनक्षत्रामध्ये खरिपहंगामाला सुरवात होत असल्याने बळीराजा आक्षयतृतीयांपासुन शेतीच्या पुर्व मशागतीला सुरवात करतो त्यासाठी शेणखताबरोबर रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहेत,बि बियाणे दर आणि खतात झालेली दरवाढ मागे घेतली तरी खत जुन्याच दरात विक्रीचा धोका संभवत आहे. शेतमालाला चांगला दर आला तरी उत्पादन खर्चात प्रंचड वाढ होत असल्याने शेतकर्याच्या हातात काहीच पडत नाहीत त्यामुळे या महागाईच्या आगडोंबाने बळीराजा मेटाकुटीला आला आल्याचे विदारक द्रुष्य दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here