Home वरोरा वरोरा तालुक्यातील गीरोला पारडीत घोंगावल चक्रीवादळ. अनेक घरांचे छत उडाले.

वरोरा तालुक्यातील गीरोला पारडीत घोंगावल चक्रीवादळ. अनेक घरांचे छत उडाले.

 

लाखो रुपयांच्या झालेल्या नुकसानीची समाजसेवक रमेश राजूरकर यांच्याकडुन पाहणी.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या गीरोला पारडी शेतशीवारात मागील तीन दिवसापूर्वी चक्रीवादळांसह जोरदार पाऊस आल्याने गीरोला गावातील घरांचे टिन व कवलाचे छप्पर उडाल्याने गावकरी शेतकऱ्यांचे अन्नधान्य व गाय बैलांचा चारा पूर्णतः भिजला त्यामुळे गावकऱ्यांची लाखो रुपयाचे नुकसान झाले या संदर्भात प्रहार संघटनेचे किशोर डुकरे यांनी ही गंभीर बाब जेष्ठ समाजसेवक तथा मनसेचे नेते रमेश राजूरकर यांच्या लक्षात आणून दिली.

या गंभीर बाबींची त्वरित दखल घेवून रमेश राजूरकर यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यासह प्रहार संघटनेचे किशोर डुकरे यांना घेऊन प्रत्यक्ष गीरोला गावातील शेतकरी बांधवांच्या नुकसानीची पाहणी केली व प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी यासाठी स्थानिक पटवारी व मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधला शिवाय दोन दिवसात जर गीरोला गावातील शेतकरी यांना प्रशासनातर्फे मदत मिळाली नाही तर तहसीलदार उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे त्वरित मदत कार्य शेतकऱ्यांना पोहचवू अशी प्रतिक्रिया रमेश राजूरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिल्या. याप्रसंगी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे प्रहार संघटनेचे किशोर डुकरे,बाळू काकडे, विशाल काकडे, ईश्वर काकडे, रूपेश मोडक, हरिदास राजूरकर, आशिष जांभूळें इत्यादींची उपस्थिती होती यावेळी गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here