Home वरोरा नावीन्यपूर्ण :- हरित मित्रांनी केले वरोरा शहरात वृक्षदान. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हजारो...

नावीन्यपूर्ण :- हरित मित्रांनी केले वरोरा शहरात वृक्षदान. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हजारो झाडे लावण्याचा संकल्प.

 

हरित क्रांतीच्या दिशेने किशोर ऊत्तरवार यांनी टाकलेल्या पाउलांवर पाऊल ठेऊन शेकडो हरित मित्रांची एकजुटता!

वरोरा प्रतिनिधी :-

जसे रक्त दान हे श्रेष्ठ दान ठरले तसे आता वृक्षदान सुद्धा श्रेष्ठ दान आहे कारण पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि प्रदूषणात होत असलेली वाढ त्यातून आरोग्यावर होणारे भयंकर परिणाम यासाठी वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच हरित क्रांती निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर किशोर ऊत्तरवार यानी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वरोरा शहरात वृक्षदाना चा नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबविला आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रम वरोरा शहर हरित मित्र परिवार नेहमीच राबवीत असते, वृक्ष संवर्धनासाठी किशोर ऊत्तारवार हे मागील 8 वर्षापासून काम करीत आहे, कधी कुणाचा सहयोग तर कधी टीम साहाय्य यातून आजपर्यंत जी झाडे लावली त्यात चंदन मिलिया लिंब ही नावीन्य पूर्वक झाडे आज वरोरा तालुक्यात हजारो च्या संख्येने मोठी झालेली दिसत आहे, आजच्या काळा नुसार जिथे 50 कोटी वृक्ष नापास झाली त्या ठिकानि नैसर्गिक oxyjen पूरक शेकडो झाडे हरित मित्र परिवाराकडून लोकांना विनामूल्य देण्यात आली व लोकांनीही ती आवर्जून नेली आज ची मागील 2 वर्षापासून शासनाकडून कुठलेही सहकार्य न घेता वृक्षदान संकल्प वरोरा येथील हरित मित्र परिवार अध्यक्ष किशोर उत्तरवार यानी केला आणि नेहमीच ते सक्रीयतेने काम करतात. जागतिक पर्यावरण दिनानिमित्य त्यांनी तालुक्यात हजारो झाडे लावण्याचा संकल्प घेऊन मित्र सहयोगातून शेकडो झाडे वाटप केली आहे त्यामध्ये बेल शेवगा जांभूळ लिंब व आवळा या झाडांचा सहभाग होता या मध्ये त्यांना वन विभागा तर्फे व विविध वृक्ष प्रेमी मित्रांनी मदत केली या प्रसंगी कार्यक्रमाचा येशस्वीतेसाठी विनोद भोयर प्रवीण भाऊ खिरटकर स्वप्नील देवाळकार बालू जीवने प्रशांत रामटेके किशोर विधाते व सर्व हरित मित्र परिवार यांनी सहयोग दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here