Home वरोरा खळबळजनक :- वरोरा शहर व तालुक्यातील अवैध रेतीचे साठे जप्त होणार?

खळबळजनक :- वरोरा शहर व तालुक्यातील अवैध रेतीचे साठे जप्त होणार?

 

उपविभागीय अधिकारी शिंदे तहसीलदार बेडके यांच्या कडून कारवाईचे आदेश?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा भद्रावती क्षेत्रात मागील वर्षी अनेक रेती माफियांवर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांनी संयुक्त कारवाई करून जवळपास २ कोटी पेक्षा जास्तीच रेती साठय़ासह मुद्देमाल जप्त केला होता त्यांतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी तहसील कार्यालयाच्या टॉवर वर चढून वीरुगीरी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, त्यामुळे अवैध रेती माफिया विरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी वरोरा तालुक्यातील अवैध रेती साठे जप्त केले होते व मागील वर्षी लॉकडाऊन च्या काळातील सर्वात मोठा महसूल उपविभागीय अधिकारी यांनी शासनाला मिळवून दिला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र अवैध रेती चोरीवर प्रशासनाला अंकुश लावण्यात मोठे अपयश मिळाले असून दरम्यानच्या काळात काही रेती घाट लिलाव झाल्याने रेती माफियांना जणू अवैध रेती उत्खननाचे परवाने मिळाले की काय असे चित्र दिसत असून रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून तो शहराच्या मध्यभागी किंव्हा बाहेर शेतात रस्त्याच्या कडेला व सूनसान जागी रेती माफियांनी हजारो ब्रॉस रेतीचे साठे साठवून ठेवले असल्याची माहिती असून या संदर्भात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे तक्रार व त्या रेती साठ्यांचे फोटो विडिओ दिले आहे आणि त्यावर तहसीलदार बेडसे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन ते रेती साठे जप्त करण्याची ग्वाही दिल्याने तहसीलदार यांनी ते रेती साठे जप्त केल्यास शासनाला जवळपास दोन कोटीच्या जवळ महसूल मिळू शकतो. अर्थात या कारवाई ने अवैध रेती साठे तयार करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here