Home क्राईम स्टोरी खळबळजनक ;- विद्यार्थिनीची छेडखानी करणाऱ्या त्या मुख्याध्यापकांविरोधात पुन्हा 7 मुलींच्या तक्रारी.

खळबळजनक ;- विद्यार्थिनीची छेडखानी करणाऱ्या त्या मुख्याध्यापकांविरोधात पुन्हा 7 मुलींच्या तक्रारी.

 

शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीची काढली होती छेड.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबर पासून वाजली, मात्र बल्लारपूर येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली होती.बल्लारपूर तालुक्यातील केम तूकूम येथील मुख्याध्यापक तुमडे यांनी एका पाचव्या वर्गातील आदिवासी विद्यार्थिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रकार करून त्या मुलीच्या गुप्तांगाला हात लावून छेड काढण्याचा खळबळजनक प्रकार त्यांनी केल्याने त्याच्या विरोधात कलम 376 (AB), 376 (2) (F), कलम 4, 6, 8 व 12 पोक्सो Pocso अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत असंतोष खदखदत असताना आता पुन्हा त्या शाळेच्या तब्बल 7 मुलींनी त्यांची सुद्धा या प्राध्यापकाने छेड काढण्याचा प्रकार केल्याची लेखी तक्रार स्थानिक बल्लारपूर पोलिससांकडे केल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

ज्ञानदानाच्या पवित्र ठिकाणी वासनांध सैतान बसले असतील तर मुला मुलीवर काय संस्कार होतील? बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक 57 वर्षीय भाऊराव तुमडे यांनी 5 व्या वर्गात शिकणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीची छेड काढली आणि संपूर्ण शैक्षणिक जगतात जणू शिक्षकी पेशाला कलंकित केल्या गेले. ह्या मुख्याध्यापकाने केवळ एकाच मुलीची छेड काढली नाही तर अख्ख्या 7 ते 8 मुलींची छेड काढल्याने आता मुलींना शाळेत पाठवायचे की नाही? हा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान 5 ऑक्टोबरला आरोपी मुख्याध्यापक तुमडे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला आज 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आता आजच्या दिवशी न्यायालयात काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous articleसनसनीखेज :- अब R,TO अधिकारी लेंगे वाहतूक गाडी मालीकोसे अधिक की एन्ट्री?
Next articleचंद्रपूर मनपासह राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचा तयारीला लागला निवडणूक आयोग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here