Home वरोरा नवराष्ट्र वर्तमानपत्रात आलेली ती बातमी चुकीच्या आधारावर, वरोरा मनविसे नवीन कार्यकारणी नाही...

नवराष्ट्र वर्तमानपत्रात आलेली ती बातमी चुकीच्या आधारावर, वरोरा मनविसे नवीन कार्यकारणी नाही झाली रद्द.

 

तथाकथित मनविसे राज्य उपाध्यक्ष मितेष खाडे व विदर्भ प्रभारी आदित्य दुरडकर यांना कार्यकारनी रद्द करण्याचे अधिकार नाही.

मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी करणार खाडे व दुरुडकर यांच्या निर्णयाची पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कार्यकारनी रद्द झाल्याची बातमी नवराष्ट्र या दैनिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यानंतर मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यानी वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर आदित्य दुरुडकर यांच्या लेटरपैडवर दिलेले ते पत्रच बेकायदेशीर असल्याची बाब उघड झाली असून नवीन कार्यकारनी हीच अधिक्रुत असल्याचे  निष्पन्न झाले आहे, दरम्यान मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी कार्यकारनी रद्द करणाऱ्या आदित्य दुरुडकर व प्रदेश उपाध्यक्ष खाडे यांच्या पत्राची पक्षाचे नेते अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

वरोरा तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा राज्य उपाध्यक्ष मंगेश डुके यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वरोरा आनंदवन चौकात जवळील श्रुजण रेस्टारन्ट मधे मनसे नेते रमेश राजूरकर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या सहमतीने करण्यात आली होती. दरम्यान जुने पदाधिकारी यांना बैठकीला बोलावण्यात आले होते व पक्षातील पालक संघटनेत पदे देऊन त्यांचे संमायोजन करण्याचे त्यावेळी उपस्थितांनी ठरवले होते पण प्रशांत झुंजारे व इतरांनी त्या पक्षाच्या बैठकीला दांडी मारली होती, त्यामुळे त्यांना पक्षात काम करण्याची इच्छा नसल्याचे दिसत असल्याने त्यांना कुठलेही पद देण्यात आले नाही.

मनविसे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत झुंजारे यांचे वय हे विद्यार्थी सेनेत राहण्यास अनुकूल नाही व त्यांनी विद्यार्थी सेनेत काम करताना शैक्षणिक विषय सोडून तालुक्यातील कंपन्या व शहरातील इतर प्रश्न घेऊन निवेदन देणे हे त्यांच्या कार्यक्षेत्रात नसलेली कामे केली, अर्थात त्यानी पक्षाच्या सहिंतेचा वेळोवेळी भंग केला असल्याने त्यांचे वय बघता आता त्यांना पक्षाच्या पालक संघटनेत पद देऊन समायोजन करण्याचे वरिष्ठांनी ठरवले होते पण त्यांना कुणाच्या नेत्रूत्वात कामच करायचे नाही म्हणून त्यांनी पक्षाचे मुंबई येथील मनविसे प्रदेश उपाध्यक्ष मितेष खाडे यांच्याकडे भेट घेतली व विदर्भ प्रभारी म्हणून आदित्य दुरडकर यांनी पत्र काढून नवीन कार्यकारनी रद्द केल्याचे पत्र काढले जे चुकीचे असून पक्षातील जिल्हा पदाधिकारी व मनविसे प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डुके यांच्या सहमतीने नवीन मनविसे कार्यकारनी पदाधिकारी जाहीर झाली असताना मुंबई येथील मनविसे राज्य उपाध्यक्ष मितेष खाडे व विदर्भ प्रभारी आदित्य दुरडकर यांना कुठलेही अधिकार नाही की त्यानी एखाद्या जिल्ह्यातील तालुका कार्यकारनी रद्द करावी दरम्यान मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यानी मितेष खाडे याना याबाबत विचारणा केली असता मला माहीत नव्हते व मी आदित्य दुरडकर याला असले प्रकार करू नको म्हणून सांगतो असे त्यानी म्हटले. अर्थात नवीन कार्यकारनी हीच अधिकृत असून जुनी कार्यकारनी बरखास्त करण्यात आली हे सिद्ध होते त्यामुळे कुणी याबाबत शंका उपस्थित करू नये असे आवाहन मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांनी केले आहे.

आदित्य दुरडकर व मितेष खाडे यांचा हा कसला खेळ? मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी व्यक्त केली नाराजी.

वरोरा तालुक्यात मनसे मनविसे चे सर्व पदाधिकारी हे संयुक्तपणे अनेक आंदोलन व कार्यक्रम घेऊन तालुक्यात चांगले काम करीत असताना मधातच असल्याप्रकारचे पक्ष फोडण्याचे धोरण अवलंबून पत्र काढण्याचे प्रकार दुर्दैवी आहे, मनविसे जिल्हाध्यक्ष यांना त्यांचे जिल्हा व तालुका पदाधिकारी नियुक्त करण्याचे अधिकार असताना प्रभारी पद असणाऱ्यांनी वरिष्ठ पदाधिकारी असल्याचा फायदा उचलून नवीन कार्यकारनी रद्द करावी ही बाब चुकीची असल्याचे मत मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी व्यक्त करून आदित्य दुरडकर व मितेष खाडे यांचा हा कसला खेळ सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित करून त्यावर नाराजी व्यक्त केली व मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी नियुक्त केलेली कार्यकारनी हीच अधिकृत आहे असे सांगितले दरम्यान या खेळीत जे सामील असेल त्यांना आपण समजावू असेही त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here