Home वरोरा चिंताजनक :- शेतकऱ्यांच्या शेतात काढणीस आलेली तूर वाळू लागल्याने शेतकरी चिंतातुर.

चिंताजनक :- शेतकऱ्यांच्या शेतात काढणीस आलेली तूर वाळू लागल्याने शेतकरी चिंतातुर.

 

पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, तुरीच्या झाल्या पऱ्हाटया; शेतकऱ्यांची चिंता वाढली.

मनोहर खिरडकर खाबाडा:-

वरोरा लुक्यातील खाबाडा परिसरात कापणीस आलेली तुर वेळेपुर्वीच वाळू लागल्याने तुरीच्या पीकाच्या तुन्हाटया झाल्या आहे. तुर अचानक वाळु लागल्याने दाणे बारीक पडत असल्यामुले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षी चांगला पाऊस होऊनही खरीप हंगामातील तुरीचे उभे पिक वाळत असल्याने शेतकऱ्यांची चिता वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर तूर पिकांवर झालेला रोगांचा प्रादुर्भाव बघता उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर तुरीच्या पीकाच्या तुराटया झाल्याआहेत. आधीच आर्थिक अडचणित सापडलेल्या शेतकन्यांच्या अडचणीत पुन्हा भर पडणार आहे. खरीप हंगामातील नगदी पीक म्हणुन ओळखले जाणारे तुर पीक आंतरपीक हणून ओळखले जाते. अतिवृष्टीच्या तडाख्यातुन बाचलेले हे पीक फुले शेंगानी बहरून जोमात आले होते.

सध्या परिपक्व अवस्थेतील पीक काढणीस आले मात्र विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या प्रार्दुभावामुळे तुरीच्या पिकांतील दाणा बारीक पडला त्यामुळे उत्पन्न शेतकऱ्यांना कमी होण्याची शक्यात आहे. बारीक तुर शेतकऱ्यांना दाळ खाण्यासाठी वापरावी लागणार आहे. खरीप हंगामातील सोयाबीनच्या पिकात जास्तीचे उत्पन घेण्यासाठी तुरीचे आंतरपिक घेतले जाते. या वर्षी या उत्पादनावर मोठा परिणाम होणार झाला आहे. या वर्षीच्या सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना आता तुरीला पण फटका बसल्याने शेतकरी हवादिल झाले आहे. ऐरवी तुर पिकाला एक किंवा दोन किटकनाशकाच्या फवारणी केल्यावर शेतकऱ्यांना अधिक फायदा होत होता पण वास्तव उलट झाले

सोयाबीन पिकाच्या नुकसानी पाठोपाठ तूर वाळण्याचे प्रमाण सुध्दा या वर्षी जास्त आहे. त्यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक समस्येचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागत आहे. दोन्ही हंगामात या वर्षात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरवर्षि तुर उत्पादन बर्या प्रमाणात मिळत असते. परंतू या वर्ष कीटकनाशकाची अतिरिक्त फवारण करुन सुध्दा तुर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा या पिकाला सुद्ध सततच्या ढगाळ वातावरणामुळ आळीचा प्रादुर्भाव झाला पावसाळा संपल्या पासून सततच्य ढगाळ वातावरणामुळे हरभरा ची झाडे पिवळे पडून जळत आहेत.

Previous articleकोरपणा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा विजयरथ रोखण्यासाठी सर्व पक्ष एकवटले.
Next articleनिवडणूक रनसंग्राम:- कोरपन्यात काँग्रेसला हरविण्यासाठी तीन माजी आमदार एकवटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here