मात्र तरीही पंज्याचीच हवा.भाजपा आघाडीचे उमेदवार संभ्रमात ?
कोरपणा प्रतिनिधी :-
कोरपणा नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचा कौल आता यायला लागला असून काँग्रेस चे विजय बावणे यांची प्रचारात मोठी आघाडी पाहता भाजप आघाडी उमेदवार आता संभ्रमात असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. ग्रामपंचायत ते नगरपंचायत अशी प्रदीर्घ सत्ता आपल्याकडे राखून ठेवणारे विजय बावणे यांच्या सत्ता काळात जी विकास कामे झाली ती निवडणुकीच्या प्रचार सभांतून जनतेसमोर आणण्यासाठी काँग्रेसचे नेते यशस्वी झाल्याने मतदारांचा कौल आता काँग्रेस च्या बाजूने दिसत आहे.
कोरपणा नगरपंचायत निवडणूक भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाला स्वबळावर लढता आली नाही याचे सर्वाना आश्चर्य वाटत असून राष्ट्रवादी शिवसेना, शेतकरी संघटना व इतर पक्षाला सोबत घेऊन भाजप आघाडी करावी लागली म्हणजे काँग्रेस च्या विजय रथाला रोखणे भाजप ला अवघड जात असल्याचे स्पष्ट होत आहे मात्र तरीही काँग्रेस ला या निवडणुकीत रोखणे भाजप आघाडीला कठीण झाले असल्याचे दिसत आहे. आता शेवटच्या घडीला काय समीकरण होईल आणि या निवडणूक प्रचारात भाजप आघाडीचे उमेदवार किती जोर लावतील याकडे जय पराजयाचे गणिते अवलंबून आहे.