Home कोरपणा अविस्मरणीय :- अन…माजी अर्थामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार सभेदरम्यान अचानक थांबवले भाषण.

अविस्मरणीय :- अन…माजी अर्थामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार सभेदरम्यान अचानक थांबवले भाषण.

 

तेंव्हा कोरपना नगरपंचायत निवडणूक प्रचार सभेच्या मंचावर सगळेच झाले स्तब्ध.

कोरपणा प्रतिनिधी :-

सध्या कोरपना नगरीमध्ये निवडणुकीचे अंतिम वारे सुरू असून राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली ह्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मोठ-मोठे नेते मंडळीच्या प्रचारसभा जोरात चालू असतानाच काल कोरपणा येथील भाजपा+शेतकरी संघटना+कोरपना शहर परिवर्तन पैनेल च्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार हे सभेत भाषण करतांना अचानक थांबले. त्या दरम्यान मंचावर एकच शांतता पसरली आणि सगळे लोक हे स्तब्ध होऊन  सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कुतुहलाने बघायला लागले पण त्यांचे भाषण सुरू झाले नाही.

या सभेत प्रमुख वक्ते सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्य आकर्षण असताना व सभेदरम्यान त्यांचे भाषण चालु असताना ते अचानक भाषण देण्याचे का थांबले? याबद्दल सर्वाना आश्चर्य वाटत होते मात्र काही मिनिटांतच मग ते बोलायला लागले, दरम्यान त्या मागचे कारण उपस्थितामध्ये सर्वाना समजले तेंव्हा सगळे लोक आश्चर्यचकित झाले की एक नेता सभास्थळाच्याच बाजूला मस्जिद होती व तिथे अजाणचा आवाज ऐकू आला असता त्यांनी आपले भाषण थांबवून एक प्रकारे एका धार्मिक विधिच्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला,व अजाण पूर्ण होत पर्यंत ते बोलायचे थांबून त्यांनी मौन पत्करले त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या या वागण्याने त्यांनी कोरपणा शहरातील जनतेच्या मनात आपले घर निर्माण केले.हा अविस्मरणीय क्षण कोरपणा वाशियांच्या नक्कीच स्मरणात राहील अशी चर्चा आहे.

या सभेत उपस्थित मुस्लिम समाजाच्या भावनाचा योग्य असा मान राखून सुधीरभाऊनी एक संवेदनशील नेत्याचा परिचय देऊन मुस्लिम जनतेसमोर आदर्श निर्माण केल्याने त्यांच्या या कृतीमुळे “असा संवेदनशील नेता आपल्याला लाभला असल्याची भावना परिवर्तन पैनेल च्या उमेदवारांना झाली त्यामुळे आता या पैनेल ला ला मत द्यायला काही हरकत नाही अशी चर्चा उपस्थितांमधे रंगली. या सभेला मा.वामनराव चटप,माजी आमदार ,मा.संजय धोटे,माजी आमदार,मा.सुदर्शन निमकर माजी आमदार , युवा स्वाभिमान पक्षाचे सूरज ठाकरे ,वरोरा नगराध्यक्ष मा.एहतेशाम अली जी मंचावर उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here