Home कोरपणा राजकीय कट्टा :- कोरपणा नगरपंचांयत निवडणुकीत कोण मारणार बाजी?

राजकीय कट्टा :- कोरपणा नगरपंचांयत निवडणुकीत कोण मारणार बाजी?

भाजपसह सगळे राजकीय पक्षाची आघाडी देणार कांग्रेसला टक्कर?

कोरपणा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय अटीतटीची निवडणूक ही कोरपणा ह्या आदिवासी बहुल क्षेत्रात सर्वांचे लक्ष वेधत असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान निवडणुकीच्या अंतिम दोन दिवसात कुणाची पोल खुलणार व कुणाचा उदोउदो होणार याबद्दल आता प्रसारमाध्यमांत चर्चा रंगणार आहे.

या नगरपंचायत निवडणुकीत काँगेस विरुद्ध भाजप व स्थानिक मित्र पक्ष अशी थेट लढत होत असली तरी शेवटी उमेदवारांचे मूल्यमापन करण्याची संधी मतदारांना आहेच त्यातही ज्या नेत्यांचे पितळ येत्या 48 तासात उघडे पडेल तिथे विरोधी पक्षाच्या नेत्यांना व उमेदवारांना त्याचा फायदा मिळणार आहे. या संदर्भात भुमीपुत्राची हाक कडे याबाबत मोठी बातमी असून ऐन वेळेवर ते उमेदवार उघडे पडण्याची शक्यता बघता दोन्ही प्रतिद्वंदि कडील उमेदवार एकमेकांकडे बोट दाखवीत आहे.आता उद्या कुणाचे पारडे जड होईल व कुणाचे पारडे खाली जाईल हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

Previous articleवयोमर्यादा ओलांडली तरी मिळणार परीक्षेची एक संधी
Next articleअविस्मरणीय :- अन…माजी अर्थामंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रचार सभेदरम्यान अचानक थांबवले भाषण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here