Home भद्रावती थरारक :- वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या पत्नी व मुलीवर धारदार शस्त्राने केला...

थरारक :- वेकोलीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या पत्नी व मुलीवर धारदार शस्त्राने केला खुनी हल्ला.

पत्नीचा वेकोली रुग्णालयात मृत्यु तर मुलीवर चंद्रपूर च्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू.

भद्रावती प्रतिनिधी : –

माणसाचा क्रोध कुठल्या स्तरांवर जाईल व त्यातून काय विपरीत घटना घडेल याचा नेम नसून माणसे आता फक्त स्वताचा विचार करायला लागली आहे व स्वताच्या स्वार्थासाठी कुटुंबातील कलह हा हत्त्या पर्यंत पोहचवीत आहे अशीच एक दुर्दैवी घटना भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना येथे घडली एक माजरी वेकोली येथील एका सुरक्षा रक्षकाने धारदार चाकूने हल्ला करून त्यांना जबर जखमी केलेआहे या हल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे तर मुलगी गंभीर जख्मी असून तीचेवर चंद्रपुरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला कशावरून झाला हा सध्या गूलदस्त्यात असून पोलीस तपासात यामागचे खरे कारण कळणार आहे.

ही थरारक घटना वेकोलि ए-टाइप वसाहत कुचना कॉलोनी येथील ब्लॉक नंबर- १० क्वार्टर नंबर – ७७ मध्ये घडली असून आरोपी वीरेंद्र रामप्यारे साहनी वय (४३) हा वेकोलि माजरीच्या खुल्या कोळसा खाणीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असून काल (१३ जानेवारी) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी पत्नी व मुलीवर धारदार चाकूने हल्ला करून तो पळून गेला. या हल्ल्यात पत्नी सुमन वीरेंद्र साहनी (३६) हिला पोटात व छातीत घाव घातले त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत वेकोलि माजरीच्या रुग्णालयात भरती केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला तर मुलगी सिमरन वीरेंद्र साहनी (१७) हिला पोटात चाकू खुपसले यात ती गंभीर जख्मी झाली असून तिचेवर चंद्रपुरच्या खाजगी रुग्णालय कुबेर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहे. आरोपी वीरेंद्र साहनी हा आपल्या घरात खूनी खेळ खेळून झाल्यावर वसाहतीची भीत ओलांडून विसलोन गावाच्या रेलवे मार्गाने पसार होत असताना कुचना कॉलोनीतील काही युवकानी पकडून माजरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here