Home नागपूर लक्षवेधक :- पूर्व विदर्भात मनसेच्या संघटन शक्तीला खीळ लावणाऱ्या हेमंत गडकरींना मिळणार...

लक्षवेधक :- पूर्व विदर्भात मनसेच्या संघटन शक्तीला खीळ लावणाऱ्या हेमंत गडकरींना मिळणार नारळ ?

पूर्व विदर्भाचा मनसेचे युवा आयकॉन अविनाश जाधव व मनसे नेते अभिजित पानसे घेणार आढावा?

विशेष प्रतिनिधी :-

पूर्व विदर्भात मनसेच्या इंजिन ला स्वताच्या स्वार्थासाठी ब्रेक लावणारे मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या चमकोगीरी च्या कहाण्या मुंबई मधे गेल्या असून त्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पदाधिकारी म्हणून शिफारस केलेले पदाधिकारी आज कुठे आहेत? याचा शोध घेण्याची गरज असून मागील सप्टेंबर 2021 ला अतुल वांदिले यांची शिफारस करून त्यांना राज्य उपाध्यक्ष सारखे महत्वपूर्ण पद दिले पण ते काही महिन्यातच राष्ट्रवादी पक्षात गेल्याने हेमंत गडकरी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात पण खेळखंडोबा?

ज्याच्याकडून आर्थिक चांगभलं होईल असे सावज हेरून हेमंत गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाची संघटन बांधणी व्यवस्थित सुरू असताना गटातटाचे राजकारण करून पक्षाचे संघटन विस्कळीत केले. जिल्ह्यात किशोर डांगे नंतर राजेश महातव जिल्हा संघटक झाले व दिलीप चाण्डक, दिलीप रामेडवार असे दोन जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात जिल्हा उपाध्यक्ष व तालुका अध्यक्ष होते पण हेमंत गडकरी यांनी नागपूर च्या सूरज ठाकरे यांना चंद्रपूर जिल्ह्यात आणून राजुरा विधानसभा क्षेत्रात जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त kele.आणि पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर अतिशय चाणक्य नितीने राजेश महातव व दिलीप चाण्डक यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि त्यानंतर पक्षाचे विघटन सुरू झाले. पक्षाचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांची हत्त्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद मधे मनसेच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या पण त्यानंतर हेमंत गडकरी यांची पक्षात एकाधिकारशाही बघता सूर घराणे पण मनसे पासून दूर गेले.

दोन वर्ष जेल मधे राहणाऱ्या विजय मराठेला जिल्हाध्यक्ष पद कशासाठी?

हेमंत गडकरी यांनी खरे तर पक्षाच्या पदाचा वापर पक्ष संघटन वाढवण्यासाठी करणे आवश्यक असताना त्यांनी स्वताच्या स्वार्थासाठी केला. कारण कोट्यावधी रुपयानी गुंतवणूकदारांची फसवणूक करणारे तत्कालीन मनसे जिल्हाध्यक्ष विजय मराठे हे तब्बल दोन वर्ष चंद्रपूर च्या कारागृहात होते व ते केवळ 6 महिन्याच्या न्यायालयाच्या ब्रांड नुसार गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठीम्हणजे ते एक प्रकारे पेरोलवर बाहेर होते तेंव्हा ह्याच हेमंत गडकरी यांनी दोन वर्षाची सजा संपवून पेरोलवर असताना त्याला मनसेचे पुन्हा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून राजसाहेब ठाकरे यांच्याकडे शिफारस केली व जिल्हा अध्यक्ष पद द्यायला लावले, महत्वाची बाब म्हणजे त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात न्यायालयाचे अटक वारंट निघाले व त्याला जेल मधे जावे लागले ही वस्तुस्थिती आहे.

पूर्व विदर्भात त्यातही राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात स्वकर्तुत्वाने साधा एक नगरसेवक निवडून आणण्याची ज्यांची कुवत नाही म्हणजे राजसाहेबांनी पक्षाचे विदर्भ संघटक ते सरचिटणीस पद गोट्या खेळायला दिले होते का? असा प्रश्न सहज कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांना पडल्याशिवाय राहाला नाही. हेमंत गडकरी यांनी स्वतःच्या बळावर अजूनपर्यंत एकही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही तर दुसऱ्यांच्या आयोजित कार्यक्रमात जणू हेच कार्यक्रमाचे आयोजक संयोजक व प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक माध्यमावर यांच्या विविध अँगल ने काढलेल्या फोटोचा नेहमीच धुमाकुळ होतं असतो. नव्हे त्यांनी एक अल्बम बनवून स्वताची राजकीय दुकानदारी राजसाहेबांकडे वेळोवेळी दाखवली आहे.

आता हेमंत गडकरींना मिळणार नारळ?

पूर्व विदर्भात पक्षाची अधोगती बघता व नुकतेच गडकरींचे सावली सारखे सोबत असलेले राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांचा राष्ट्रवादी पक्षात झालेला प्रवेश बघता पक्षाला पूर्व विदर्भात मजबूत करण्यासाठी मनसेचे युवा आयकॉन अविनाश जाधव व मनसे नेते अभिजित पानसे यांची पूर्व विदर्भ संपर्क नेते म्हणून जबाबदारी निश्चित होऊ शकते व लगेच सोमवारपर्यंत त्यांचा दौरा निश्चित होऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे मनसे सरचिटणीस हेमंत गडकरींना पक्षाकडून नारळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here