Home महाराष्ट्र दखलपात्र :- मनसे नेते तात्या मोरे यांच्यात मला देव दिसला,

दखलपात्र :- मनसे नेते तात्या मोरे यांच्यात मला देव दिसला,

मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी पैशाच्या विवंचनेत धडपडणाऱ्या महेश गाढवे यांनी दिली प्रतिक्रिया.

मनसे नेते तात्या मोरेच्या आवाहनानंतर चेतन गाढवे या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 14 लाख जमा.

पुणे न्यूज वार्ता :-

राजकारणात अनेक लोक सामाजिक कार्यात असतात पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अविनाश जाधव, तात्या मोरे, गजानन काळे व इतर महाराष्ट्र सैनिक यांच्या सामाजिक कार्याचा जो झंझावात चाललाय तो महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात नोंद घेण्यासारखाच आहे.अशाच एका सामाजिक कार्याने अख्खा महाराष्ट्र भारावून गेला तो म्हणजे तात्या मोरे यांनी केलेल्या अभूतपूर्व मदतीने , प्रसंग होता चेतन महेश गाढवे याच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 15 लाख रुपये जुळवायचा, वडील महेश गाढवे चिंतेत होते आणि त्यांची पैशासाठी धावपळ सुरू होती त्यावेळी मनसे नेते तात्या मोरे यांच्या कानावर ही बातमी आली आणि मग तत्काळ त्यांनी स्वतःची अगोदर मदत पाठवून फेसबुक पेजवर आवाहन केले की चेतन च्या शस्त्रक्रियेसाठी मदत करा. आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच चेतन च्या बैंक खात्यात तब्बल 14 लाख रुपये जमा झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य गोरगरीब शोषित पीडितांना ज्या पद्धतीने मदत करतात ते कार्य प्रशंसनीय आहेच पण मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी धडपडणाऱ्या महेश गाढवे यांना मदतीसाठी धावून आलेल्या तात्या मोरे यांच्यात देव दिसला हे त्यांनी आवर्जून सामाजिक माध्यमातून सांगितले ते फार मार्मिक आहे.असेही नेते केवळ निवडणुकीपुरते जनतेच्या सेवेत असतात पण सामाजिक कार्यात ते कधी झोकून देत नाही कारण त्यांना वाटतेय की जनतेची कितीही मदत केली तरी निवडणुकीत पैसे वाटल्या शिवाय निवडून येत नाही त्यामुळे अतिशय धंदेवाईक राजकारणी जनतेच्या दुखाच्या संकटाच्या काळात मूकदर्शक बनले असतात पण महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी (काही वगळता ) नेहमीच जनतेच्या दुःखात आणि संकटात धावून जावून खुल्या दिलाने मदत करतात. अशीच एक तात्काळ मदत शस्त्रक्रियेच्या संकटात सापडलेल्या गाढवे कुटुंबीयांना मनसे नेते तात्या मोरे यांनी केल्याने मुलाचे वडील महेश गाढवे यांनी आनंद व्यक्त करून तात्या मोरे यांना देव म्हणून उल्लेख केला.

कु.चेतन महेश गाढवे याच्या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर ने तब्बल 15 लाख रुपये लागतील म्हणून त्याचे वडीलाना सांगितले त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय असलेले महेश गाढवे यांच्याकडे नसल्याने त्यांनी पैशासाठी इकडे तिकडे भटकंती केली. ही बातमी मनसे नेते तात्या मोरे यांना कळतात त्यांनी तात्काळ स्वताकडील मदत देऊन परवा रात्री एक फेसबुक पोस्ट टाकली आणिआवाहन केले की संकटात सापडलेल्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करा. त्यांच्या एका पोस्टने एका रात्रीत तब्बल १४ लाख २ हजार ९१२ रु. चेतनच्या खात्यात जमा झाले आणि शस्त्रक्रिया पार पडून काल चेतन शुद्धीवर आला. चेतन चे वडील महेश गाढवे यांनी मनसे नेते तात्या मोरे यांचे जाहीर आभार मानून ते म्हणाले की “मला महाराष्ट्र नवनिर्माण सेना माहीत होती पण त्या पक्षाचा देव माणूस मला माहीत नव्हता तात्या मोरे खरे तर आमदार असायला हवे होते कारण आमदार खासदार नसताना त्यांच्या एका हाकेला मला लाखो रुपयाची मदत मिळाली.”

Previous articleसनसनीखेज :- चंद्रपूर वणी से मध्यप्रदेश पहुंचे कोयला स्टॉक पर मध्यप्रदेश प्रशासन की बडी कारवाई.
Next articleसनसनीखेज :-मध्यप्रदेश पॉवर जनरेशन कंपनी लि पर क्यो मंडरा रहा बिजली उत्पाद का संकट?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here