Home भद्रावती मागणी :- शेतकऱ्याला दारू पाजून शेतीची बोगस विक्री करणाऱ्या गोविंद तेला सह...

मागणी :- शेतकऱ्याला दारू पाजून शेतीची बोगस विक्री करणाऱ्या गोविंद तेला सह दलाला वर कारवाई करा

पिडीत शेतकरी नरेंद्र थेरे यांचा भाऊ विनोद थेरे यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी घेतला पुढाकार. 

चंद्रपूर :-

भद्रावती तालुक्यातील डोंगरगाव येथील नरेंद्र थेरे  ह्या दारूच्या आहारीगेलेल्या शेतकऱ्याची शेत जमीन गोविंद तेला नावाच्या व्यापाऱ्याने काही दलालांच्यामाध्यमातून बोगस रजिस्ट्री करून हडपल्याचा संतापजनकप्रकार घडला असून त्या शेतकऱ्यांच्यासंयुक्त सातबारा असलेल्या त्यांच्या विनोद थेरे नावाच्या भावाने या संदर्भात दोषी असलेल्या व्यापारी व दलालांवर गुन्हे दाखल करून ती रजिस्ट्री रद्द करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे. या पत्रकार परिषदेलामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी सुद्धा पिडीत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी दोषी अधिकारी आणि संबंधित व्यापारी दलाल यांना धडा शिकवणार असल्याचे म्हटले आहे.

चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकदेत डोंगरगाव येथील शेतकरी नरेंद्र लटारी थेरे यांनी मला दारू पाजुन अपहरण केले व मला दारूच्या नशेत ठेऊन माझ्या शेतजमिनीची बोगस विक्री केल्याचे सांगितले यावेळी त्याचे भाऊ विनोद थेरे व प्रमोद थेरे यांनी सुद्धा माझ्या भावाचे अपहरण करून बोगस विक्री गोविंद तेला व इतर दलालांनी केल्याचा आरोप केला, या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून जमीन घेणाऱ्या गोविंद तेला व दलाल शशिकांत विरुटकर आणि नरेश मांडवकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

नंदोरी गावातील नरेंद्र लटारी थेरे याला दारुची अतोनात सवय असल्याने त्याचे घर संसारात लक्ष नव्हते. त्यामुळे त्यांची पत्नी नाईलाजास्वत तिचे माहेरी तिचे वडीलांकडे सेलू येथे राहत आहे. दरम्यान नरेंद्र थेरे यांची वडीलोपार्जीत मालकीची शेतजमीन मौजा डोंगरगांव (खडी), ता. भद्रावती, जि. चंद्रपुर येथे भु. क. ७६/२, आराजी १.८९ हे. आर शेतजमीन असुन सदरची शेतजमीन नरेंद्र व विनोद लटारी थेरे यांच्या नावाने सयुक्तपणे दर्ज आहे. यामध्ये शेतजमीनीत नरेंद्र थेरे यांच्या नावाने ०. ९४ हे. आर हिस्सा असुन नरेंद्र ला दारुचे अनोनात व्यसन असल्याने त्याचा फायदा घेऊन गोविंदा तेला यांनी शशिकांत विरूटकर, नरेश मांडवकर, शंकर अडूर यांच्या मदतीने नरेंद्र थेरे याला दि. २१/०२/२०२२ रोजी नंदोरी बु. फाटयावरुन वरोरा येथे दारु पिण्यासाठी आणले व त्याचे अपहरण करून त्याला भारत लॉज येथे ठेवले दरम्यान त्याचे एच. डी. एफ. सी. बैंक वरोरा येथे खाते क्र. ५०१००४९१४९२४२१ हे बचत खाते काढले व बैंक पासबुक, ए. टी. एम. व चेकबुक काढून ते शशिकांत विरुटकर यांच्याकडे ठेवले व शंकर अडूर यांनी नरेंद्र थेरे यांचे दारूच्या नशेत असताना फोर व्हीलर गाडीतून फिरवीले. दि. २१/०२/२०२२ रोजी वरोरा येथे विक्री दस्त तयार केला व २३ फेब्रुवारी ला भद्रावती येथे विक्री केली,

गोविंदा तेला यांनी शशिकांत विरूटकर, नरेश मांडवकर, शंकर अडूर यांच्या मदतीने दारूच्या नशेत असणाऱ्या नरेंद्र थेरे या शेतकऱ्यांची शेत जमीन हडप ली असल्याने त्यांची पत्नी साधना थेरे यांनी वरोरा पोलीस स्टेशन मधे करून त्यांच्यावर सावकारी कायद्यांतर्गत व फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मात्र पोलिसांनी अजुनपर्यत कुणावरही कारवाई केली नसल्याने शेतकरी नरेंद्र थेरे यांचे भाऊ विनोद व प्रमोद थेरे यांनी जर पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केली नाही तर प्रशासनाविरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे उपस्थित होते.

Previous articleराजकीय कट्टा :- मनसेच्या वरोरा शहरात १० शाखांचे थाटात उद्घाटन, औचित्य शिवजयंतीचे.
Next articleशेतकऱ्यांचे अपहरण करून शेतजमीन हडपनाऱ्या गोविंदा तेलासह इतरांवर अजूनही कारवाई का नाही ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here