Home क्राईम स्टोरी ब्रेकिंग :- मनसेचा आक्रमक पवित्रा आणि कलकाम कंपनीच्या संचालकांवर कारवाई सुरू.

ब्रेकिंग :- मनसेचा आक्रमक पवित्रा आणि कलकाम कंपनीच्या संचालकांवर कारवाई सुरू.

कलकाम रिअल इस्टेट कंपनीच्या संचालक व इतरांवर एम.पी. आय. डी. अंतर्गत त्वरीत गुन्हे दाखल होणार.

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची अंदाजे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांनी फसवणूक करणाऱ्या कलकाम रिअल इन्फ्रा (इं) लि. या कंपनीच्या संचालकांवर व त्यांना साथ देणाऱ्या गुंडावर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा व गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये त्यांना मिळवून द्यावे अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात कलकाम कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली होती व त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या 20 मे पर्यंत पोलिसांनी कलकाम कंपनीच्या संचालकांविरोधात एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कलकाम कंपनीच्या संचालकांविरोधात कारवाईला सुरुवात केली असल्याने जिल्ह्यातील कलकाम कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांचे न्यायालयाच्या माध्यमातून गुंतवलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सपना टाकीज समोर असलेल्या कलकाम कंपनीच्या विदर्भाच्या कार्यालयाला सध्या कुलूप लागले आहे त्यामुळे आपले पैसे परत मिळणार नाही म्हणून जिल्ह्यातील गडचांदूर, कोरपना, राजुरा ,बल्लारपूर, मूल, ब्रम्हपुरी, भद्रावती, चंद्रपूर, घुग्गुस येथील कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदारांनी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी करून कंपनीचे विष्णू पांडूरंग दळवी, सि.एम.डी. कलकाम रिअल इन्फा (इं) लि. मुंबई, विजय सुपेकर (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. सुनिल वांद्रे (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. मुंबई) अनिल पासवान विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. ५) महमद इदरीस विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. मुंबई) विजय वासुदेव येरगुडे विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर विदेश प्रभाकर रामटेके विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर किसन मोतीराम पेंदोर रा. राजूरा व या सर्वाना साथ देणाऱ्या गुंड प्रव्रुत्तिच्या भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर यांच्यावर एमपीआयडी कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु पोलीस प्रशासनाला गुंगारा देऊन स्थानिक पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली होती मात्र गडचांदूर ते मुंबई असा प्रवास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे पैसे मिळावे म्हणून लढा उभारणाऱ्या गडचांदूर टीम ने हार न मानता जो संघर्ष केला व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी देण्यास सुरुवात केली त्यामुळे पोलीस प्रशासनाला या संदर्भात दखल घ्यावी लागली व कलकाम कंपनीच्या स्थानिक पदाधिकारी विदेश रामटेके विजय येरगुडे यांच्यासह त्यांना साथ देणाऱ्या गुंडावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गुंतवणूकदारांनी थोतांड लोकांपासून सावध राहावे.

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कलकाम कंपनीच्या गुंतवणूकदारांचा प्रश्न निकाली निघत असताना दुसरीकडे शरद पवार विचार मंच्यातर्फे दिलेल्या निवेदनामुळे पोलीस कारवाई करत असल्याची थोतांड बातमी काही संधीसाधू करत आहे पण जर राष्ट्रवादी च्या लोकांनी हा विषय खरोखर पोलिसांकडे रेटला असता व त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली असे जर समजले असते तर मनसेच्या नेत्रुत्वात झालेल्या पत्रकार परिषद व त्या अगोदर 15 दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीनुसार गडचांदूर च्या कार्यालयाला अगोदर पोलिसांनी टार्गेट केले नसते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खरं तर यामागे कुणाला वाचविण्यासाठी शरद पवार विचार मंच तर पुढाकार घेत नसेल अशी शंका समोर येत आहे त्यामुळे त्यांच्या या कथित बातमीवर कुणी विश्वास ठेऊ नये असे आवाहन कंपनीच्या एजंट कडून गुंतवणूकदारांना करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here