Home वरोरा संतापजनक :- पोलीस पाटील दीपक शेंबळकरांनी पॉस्कोचा गुन्हा होईल म्हणून मुलांचे लावले...

संतापजनक :- पोलीस पाटील दीपक शेंबळकरांनी पॉस्कोचा गुन्हा होईल म्हणून मुलांचे लावले लग्न.

दोन महिन्याच्या गरोदर सुनेला रात्रीला काढले घराबाहेर शेगांव पोलीस स्टेशन मधे मुलीची तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य सरकारने गावातील तंटे गावातच सोडवावे म्हणून तंटामुक्ती समिती सह पोलीस पाटलांची प्रत्तेक गावात नियुक्ती केली पण पोलीस पाटीलच जर दारू पिऊन तंटे करत असतील व महिलांवर अन्याय करत असतील तर त्या पोलीस पाटलांची उचलबांगडी करणे आवश्यक आहे. अशाच प्रकारची संतापजनक घटना शेगांव पोलीस स्टेशन अंतर्गत पारोधी या गावात घडली असून या गावाचा पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांनी त्यांच्या मुलाने एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेऊन लग्नास नकार दिला होता मात्र पोलिसांकडून पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होईल या भीतीने त्यांनी आपल्या मुलांचे लग्न त्या पिडीत मुलीशी लावून दिले खरे पण लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच गरोदर सुनेला रात्री घराबाहेर हाकलून एक प्रकारे पोलीस पाटील पदाचा दुरुपयोग केला त्यामुळं दीपक शेंबळकर यांचेसह त्यांच्या मुलांच्या विरोधात शेगांव पोलीस स्टेशन मधे पिडीत मुलीने तकार दिली असल्याने पोलीस पाटील पद धोक्यात आले आहे. मात्र शेगांव पोलीस स्टेशन मधे त्यांचे मधुर समंध बघता तेथील पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याची माहिती पिडीत मुलीच्या आईने दिली आहे. त्यामुळे पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांच्यावर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत कारवाई होणे अपेक्षित आहे.

पोलीस पाटील दीपक शेंबळकरांनी गावात विविध तंटे सोडविण्यापेक्षा त्यांनी अनेक तंटे घडवून आणले. उदाहरण द्यायचे झाल्यास ऋशी शेंबळकर यांचे गावातील एका मुलीवर प्रेम होते व दोघांनी न्यायालयात जावून लग्न पण केले होते मात्र पोलीस पाटील दीपक शेंबळकरांनी तिथे टांग अडवून मुलीच्या वडीलाला भडकावून मुलीला जाणीवपूर्वक या त्या गावात पाठवून दोघांचे लग्न तोडण्याचे पातक केले होते आणि आता स्वतःच्या मुलाने सुद्धा प्रेम प्रकारांतून लग्न केले तर ते लग्न सुद्धा मोडण्याचा प्रयत्न हे पोलीस पाटील करत आहे अर्थात ते पोलीस पाटील पदाला न्याय न देता गावात तंटे निर्माण करतात व उलटे सल्ले देऊन संसार मोडतात त्यामुळे दीपक शेंबळकर यांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. जो स्वतःच्या मुलाला गुन्ह्यापासून वाचविण्यासाठी मुलीसोबत लग्न लावून देतो व आता त्याच मुलीला रात्री घराबाहेर हाकलून देतो म्हणजे या पोलीस पाटलांची माणुसकी हरवली कां ? दररोज दारू पिवुन दुसऱ्यांच्या निंदा नालस्त्या करून कुणावर अन्याय करतो तर मग पोलीस पाटलांवर गुन्हा दाखल व्ह्ययला हवा की नाही ? असा सहज प्रश्न सामन्या जनतेला पडतो आहे. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेइल यावर सर्व अवलंबून असून पोलीस प्रशासन काय भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महिला तक्रार निवारण केंद्रात पोलीस पाटील व मुलगाहीअनुपस्थित?

स्वतःच्या सुनेला रात्रीच्या वेळेस बाहेर काढणाऱ्या पोलीस पाटील दीपक शेंबळकरांविरोधात शेगांव पोलीस स्टेशनमधे सुनेने तक्रार दिल्यानंतर  महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक यांनी मुलगा व सासरा पोलीस पाटील दीपक शेंबळकरांना समन्स द्वारे व फोन द्वारे बोलावले पण ते वरोरा पोलीस स्टेशनअंतर्गत समुपदेशन केंद्रात हजर झाले नाही त्यामुळे पोलीस पाटील दीपक शेंबळकरांचे काय मनसुबे आहेत आणि त्यांना शेगांव पोलीस स्टेशनमधे काय पाठबळ मिळतेय हे आता बघावे लागेल.पण गावात जर पोलीस पाटील आपल्या सुनेवर अन्याय करत असेल तर असला पोलीस पाटील काय कामाचा ? असाही प्रश्न त्या अर्थाने विचारला जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here