Home भद्रावती विशेष वार्ता :- भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,

विशेष वार्ता :- भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,

किसान युवा क्रांती संगठनेचे भद्रावती तालुका अध्यक्ष रविंद्र गेजीक यांची मागणी.

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाल्याने त्या शेतापिकांचे पंचनामे करुन तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान ‌भरपाई द्या अशी मागणी किसान युवा क्रांती संगठनेचे भद्रावती तालुका अध्यक्ष रविंद्र गेजीक यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भद्रावती तालुक्यात दहा ते पंधरा दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली असल्याने भद्रावती तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगच्च भरुन वाहू लागले आहे. होणाय्या सततधार पावसामुळे शेत जलमय झाले असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे, यामुळे शेतात असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस झाला आहे. त्यामुळे ही पूर सदृश्य परिस्थिती पाहता भद्रावती तालुका ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या अशी मागणी किसान युवा क्रांती संगठनेद्वारे करण्यात आली आहे.

भद्रावती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच पेरणी करून नामांकीत कंपनीचे बियाणे वापरले आहे उदारणार्थ . ओसवाल,विक्रांत, इ.कंपन्याचा समावेश आहे परंतु सततधार पावसाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असून यात अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन दुबार पेरणी करावी लागणार आहे त्यामुळे या दुबार पेरणीने अनेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्वरित पुरपीडित व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून त्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची आर्थिक नुकसानभरापाई द्यावी अंन्यथा किसान युवा क्रांती संगठना आंदोलन करेल असा इशारा भद्रावती अध्यक्ष रविंद्र भाऊ गेजीक यांनी निवेदनातून शासनाला केला आहे याप्रसंगी विकास गजभे भारत बेलेकर रोशन मानकर अजय मत्ते लोकेश पोपटे पवन ढोके आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here