Home वरोरा श्री सिद्धिविनायक नागरी पत संस्था संचालकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा.

श्री सिद्धिविनायक नागरी पत संस्था संचालकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा.

अँड अमोल बावणे यांची ग्राहकांच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक  यांच्याकडे मागणी.

चंद्रपूर :- २६/०७/२०२२

वरोरा येथील नेहरू चौक वरोरा येथे कार्यरत श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत ठेवीदार व ग्राहक यांचे जवळपास अंदाजे १२०० पेक्षा जास्त ठेवीदारांची रक्कम अंदाजे ७० लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम ठेवी म्हणून ठेवले मात्र कालावधी उलटून गेल्यानंतर ही सदर ठेवीदार यांच्या ठेवी परत देण्यात आलेल्या नाही, सदर ठेवी पतसंस्थचे अध्यक्ष, सचिव व इतर संचालक आणि कर्मचारी यांनी आपसात वाटून पतसंस्था दिवाळखोरीत काढल्यामुळे आता सर्व ठेवीदारांच्या ठेवी मिळाल्या नसल्याने तालुका व जिल्हा निबंधकांकडे यांच्यासह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या पण जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटून सुद्धा पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल झाले नाही त्यामुळे आता ठेवीदार आर्थिक संकटात सापडला आहे.

सिद्धिविनायक नागरी पत संस्थेचे ठेवीदार व ग्राहक यांनी पतसंस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात सहायक निबंधक सहकारी संस्था तालुका वरोरा या कार्यालयाला दिनांक १५.०७.२०२१ रोजी तक्रारी दाखल केल्या व त्यांनतर जिल्हा उपनिबंधक चंद्रपूर यांच्याकडे सुद्धा विविध ग्राहकाकडून व संघटने कडून तक्रारी दाखल केल्या, परंतु सदर सहाय्यक निबंधक कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालय हे पतसंस्थेचा भ्रष्टाचार लपविण्याकरिता, भ्रष्टाचारी संचालक यांची पाठ राखण करीत आहे. तालुका सहाय्यक निबंधक यांच्या या भ्रष्ट नितिविरोधात ग्राहकानी वरोरा कार्यालयात ठिय्या आदोलन केले होते, तेव्हा पासून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून पतसंस्थेवर प्रशासक यांची नियुक्ती करण्यात आली , परंतु प्रशासक नेमणूक केल्या नंतर सुद्धा आज पावेतो प्रशासकाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही जेंव्हा की सदर ठेवीदारांना प्रशासक नियुक्तीच्या वेळी १ महिन्याच्या आत ठेवीदाराची रक्कम मिळवून देणार अन्यथा संबंधित संचालक मंडळावर कठोर कार्यवाही करणार अशी हमी दिली होती, परंतु ग्राहकांनी तक्रार दिलेल्या दिनाकापासून १ वर्षाचा कालावधील लोटूनही आज पावेतो या प्रकरणात ग्राहकावर व ठेवीदार यांची रक्कम देण्यात आली नाही, व सबंधित संचालक मंडळ यांच्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली नाही.

सहायक निबंधक कार्यालात श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात विविध तक्रारी ग्राहकाकडून करण्यात आल्या त्यामुळे पतसंस्थेने सन २०२० ते २०२१ या कालावधीचे (ऑडिट )लेखापरीक्षक श्री. ए. के. माटे लेखापरीक्षक श्रेणी २ सहकारी संस्था वरोरा यांनी केले असता ते ऑडिट खोटे व बनावटी दिसून आले. श्री. माटे यांनी संस्थेचा आर्थिक घोटाळा लपविण्याकरिता व संचालक मंडळ यांना वाचविण्याकरिता संचालक मंडळाकडून पैसे घेवून खोटे ऑडिट तयार केले आहे. त्यामुळे या पतसंस्थेचे नव्याने ऑडिट करण्याची मागणी सुद्धा ग्राहकांनी केली आहे.

काही ग्राहकानी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी व विवाह कार्यक्रम व रोगावर उपचारासाठी रक्कम म्हणून ठेवी ठेविल्या होत्या,त्या ठेवेची रक्कम वेळेवर न मिळाल्या मुळे ग्राहकाला खूप आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

सदर पतसंस्थेचे सर्वाधिक ग्राहक हे ग्रामीण भागातील ठेवीदार व ग्राहक आहे यात महिला, मजूर, शेतकरी, छोटे व्यावसाहिक असे ग्राहक आहे. ग्राहकांना त्यांची रक्कम न मिळाल्यामुळे ग्राहकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे . त्यामुळे प्रशासकांनी श्री सिद्धिविनायक पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी व लेखापरीक्षक श्री. ए. के. माटे व इतर दोषी वर एमपीआयडी कायदा 1999 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करुन कठोर कार्यवाही करावी अशी मागणी ग्राहक व ठेवीदार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे, याप्रसंगी अँड अमोल बावणे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, गुणवंत खिरडकर,अशोक भोंग, प्रकाश झिले, मंगेश तेलरान्धे, प्रमोद गाते, डेव्हीड पेरकेवार,पुरुषोत्तम पावडे करुणा पिसे. मीरा वराडे, संजय घाटे. जया तुंबडे सुधा उपरे सूरज तडस रवि मैस्के इत्यादींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here