Home वरोरा जंगली नीलगाय चक्क घुसली घरात. पारधी टोला येथील थरारक प्रकार.

जंगली नीलगाय चक्क घुसली घरात. पारधी टोला येथील थरारक प्रकार.

निलगायिच्या मागे लागलेल्या कुत्र्यांनी तिला  जखमी केल्याने मनसे शाखा अध्यक्ष सुनील घोसरे यांनी केली मरमपट्टी.

वरोरा प्रतिनिधी :-

तसे पाहता पावसाळा सुरु झाल्यानंतर जंगली प्राणी जंगलात स्थिर होतात असे म्हटल्या जाते पण पावसाळ्यात जंगली प्राणी गावांमध्ये येऊ लागले आहे. त्यामुळे आता ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमधे भीतीचे वातावरण आहे. असाच एक प्रकार वरोरा तालुक्यातील मजरा गावाशेजारी असलेल्या पारधी टोला गावात दोन दिवसांपूर्वी घडला असून कुत्र्यांच्या कचाट्यात सापडलेली नीलगाय चक्क घरात घुसल्याने एकच खळबळ उडाली होती दरम्यान वनविभागाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी पोहचले व नीलगाय हिला जेरबंद करून उपचारार्थ रुग्णालयात नेले व तिथून त्या निलगाईला जंगलात सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार पारधी टोला परिसरात मोठ्या प्रमाणात नील गायींचा कळप असतो पण त्या केवळ आजूबाजूला चारा खाण्यासाठी येतात पण दोन दिवसांपूर्वी कळपातील एक नीलगाय चरत राहिली व तिला एकटी पाहून गावातील कुत्र्यांनी तिचेवर हल्ला चढवला त्यामुळे भयभीत झालेली नीलगाय चक्क अर्धा तास कुत्र्यांपासून आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत होती पण आता तिच्या धावण्यामुळे ती पुरती थकली व पारधी टोला गावात शिरुन तेथील एका घरात शिरली व तिथून हकलल्या नंतर ती दुसऱ्या घरी शिरली त्यामुळे घरातील सामानाची नासधूस झाली. त्यामुळे वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

नीलगाय कुत्र्यांच्या चाव्यामुळे व काटे व तार रुतल्याने जखमी झाली होती त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी येऊन तिच्यावर उपचार करणारच होते पण माणुसकीच्या नात्याने पारधी टोला या गावाचे मनसे शाखा अध्यक्ष सुनील घोसरे यांनी निलगायिच्या जखमांवर हळद व इतर मलमपट्टी केली त्यामुळे सुनील घोसरे यांचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धन्यवाद मानले आहे.

Previous articleसावली नगरपंचायच्या मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार ?
Next articleश्री सिद्धिविनायक नागरी पत संस्था संचालकांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here