Home वरोरा चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत...

चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करा.

जेष्ठ नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन.

वरोरा प्रतिनिधी  :-

चंद्रपूर जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती पुराच्या पाण्यात बुडून शेतकऱ्यांच्या शेतापिकांचे व खेड्यातील घरांचे अतोनात नुकसान झाल्याने विदर्भासह चंद्रपूर जिल्हयात ओला दुष्काळ घोषित करून हेक्टरी 50 हजाराची तात्काळ मदत कराअशी मागणी मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात मनसे च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार यांच्यामार्फत दिले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी काठावर वसलेल्या अनेक गाव व शेती शिवारात सततधार पावसाने व आलेल्या महापुराने शेतकऱ्यांची पिके पाण्यात बुडाली व गावात पाणी शिरून अन्नाधान्य व इतर वस्तू सुद्धा पाण्यात बुडाल्याने मोठे नुकसान झाले आहे, पूर थोडा ओसंरला असला तरी शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी सुद्धा करण्याची संधी मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे, दरम्यान शेतकऱ्यांचा हा हंगाम पूर्णतः खाली जाऊन शेतात पेरलेले बियाणे व त्यावर मारलेली औषधी व रासायनिक खते याचा खर्च जणू पाण्यात गेल्याने शेतकऱ्याजवळ पैसाच नसल्याने शेताकऱ्यांनी आता जगायचे की मरायचे? हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे त्यामुळे आपण ज्या शिवशाहीच्या पद्धतीने सरकार चालवण्याची शपथ घेतली आहे त्या दृष्टीने आपण जर विदर्भासह चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरापाई दिली तर किमान पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळेल असे मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले.

राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करीत त्यांना मदतस्वरूपी आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे, तसेच ओला दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावीत, त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, तसेच अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना आगामी काळात खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यासाठी विशेष अनुदानाची घोषणा करून ते त्वरित वितरित करावे, एकूणच अस्मानी संकटात आपण ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकरी शेतमजूर यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना यांना पोस्ट करण्यात आल्या याप्रसंगी मनसे नेते रमेश राजूरकर. मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जिल्हा सचिव विनोद सोनटक्के तालुका अध्यक्ष वैभव दहाने. तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी शहर उपाध्यक्ष श्रीकांत तळवेकर. तालुका सचिव कल्पक ढोरे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here