Home वरोरा खळबळजनक :- सावकारी कर्ज्याच्या बोझ्यात शरद चौधरी या शेतकऱ्याची आत्महत्या?

खळबळजनक :- सावकारी कर्ज्याच्या बोझ्यात शरद चौधरी या शेतकऱ्याची आत्महत्या?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, सावकारांचे कर्ज व संततधार पावसात पिकांचे नुकसान झाल्याने टोकाचा निर्णय.

वरोरा प्रतिनिधी :-

यावर्षी संततधार पाऊस व त्यामुळे आलेला पूर शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असून आता शेतात पेरायचे काय ? या विवंचनेत शेतकरी हवालदिल झाला आहे. सुरुवातीला पेरलेले बियाणे हे पीक कर्जाच्या माध्यमातून घेतले त्यासाठी रासायनिक खते व औषधी सुद्धा घेतली मात्र आता नव्याने बियाणे व खते औषधी घ्यायचे कुठून हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याने शेतकऱ्यांसमोर आत्महत्या सारखा मार्ग उरतो. कारणं शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली नाही काही शेताचे तर पंचनामे सुद्धा झाले नाही मग सरकारची मदत होणार कधी ?या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे अशीच एक दुर्दैवी व तितकीचखळबळजनक घटना तालुक्यातील आमडी येथे घडली असून बैंक व सावकारी कर्जाच्या बोझ्यात अडकलेल्या शरद पुंजाराम चौधरी (वय 42) या शेतकऱ्याने आत्महत्या काल दुपारच्या सुमारास केल्याची माहिती आहे.

आमडी येथील रहिवासी तसेच अल्पभूधारक शेतकरी शरद चौधरी यांच्यावर CDCC बँकेचे कर्ज होते. उत्पन्नाचे कोणतेही पर्याय खुले दिसत नसल्याने नैराश्यातून मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना शरद चौधरी यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. गेल्या चार वर्षांपासून शेतातील सततची नापिकी तसेच अतिवृष्टी, पुरामुळे यावर्षी शेतात काहीच राहिले न्हवते. 2 एकर शेतीत पुराचे पाणी गेल्याने मुलींचे शिक्षण, म्हाताऱ्या आई वडिलांचा सांभाळ कसा करायचा? या चिंतेने त्याने काल आपली जीवनयात्रा संपवली.

Previous articleअत्यंत वाईट :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकचे लिपिक अमर रंदयीने चक्क आईलाच फसवलं.
Next articleराजकीय कट्टा :- भाजप संसदीय मंडळात मराठी नेता नसणे हा महाराष्ट्राचा अपमान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here