Home वरोरा दखलपात्र :- हॉटेल एन्जाय रेस्टारेंटची कर आकारणी रद्द करा.

दखलपात्र :- हॉटेल एन्जाय रेस्टारेंटची कर आकारणी रद्द करा.

माजी नगरसेविका दिपाली किशोर टिपले यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

शहरातील गजानन मंदिर जवळ, आझाद प्रभाग येथील हॉटेल एन्जाय रेस्टारेंट,ची कर आकारणी रद्द करण्याबाब दिपाली किशोर टिपले, माजी नगरसेविका प्र.क्र.११. यांनी वरोरा नगरपरिषद मुख्याधिकारी यांचेकडे तकार केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रज्वल हरेन्द्र अस्कर हे जिजामाता वार्ड, वरोरा येथील रहिवासी असून सदर व्यक्तीने मौजा वरोरा येथे गजानन मंदिर जवळ, जिजामाता वार्ड, आझाद प्रभाग या ठिकाणी हॉटेल एन्जाय रेस्टारेंट या नावाने राज्य उत्पादन शुल्क विभाग, यांचेकडे सदर हॉटेल मध्ये बार चे. परमिट मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला, दरम्यान ही जागा निवासी झोन मधे येत असताना या हॉटेल्स ला वाणिज्य वापरासाठी कर आकारणी केल्याने वार्डातील नागरिक या बार निर्मिती विरोधात एकवटले आहे त्यामुळे वार्डातील महिलांच्या हक्कांसाठी माजी नगरसेविका दिपाली किशोर टिपले यांनी पुढाकार घेऊन या एन्जॉय हॉटेलची कर आकारणी रद्द करण्याची मागणी केली आहे.

काय आहेत नियम ? काय आहे स्थिती ?

कोणत्याही हॉटेलचे किंवा बारचे परवाना देतांना धार्मिक स्थळापासून सदरचे हॉटेल अंतर हे ७५ मिटर पेक्षा दुर असावयास पाहिजे असा नियम आहे. परंतू सदर हॉटेल हे गजानन मंदिराला लागून आहे.सदर गजानन मंदिरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम होतात व त्यासाठी स्त्रिया व पुरूष तसेच भाविक मंडळी सदर मंदिरात येत असतात. त्यामुळे सदर हॉटेलचे किंवा बारचे वातावरणामुळे व सदर हॉटेल किंवा बार मधून निघणाऱ्या व्यक्तीमुळे या परिसरातील स्त्रीया व पुरूषांना अश्लिल शिवीगाळ व असभ्य वागणूक होईल त्यामुळे मंदिराचे पावित्र्याला धोका निर्माण होणार आहे.तसेच सदर मंदिराचे आवारात लहान मुलांचे खेळणे लागलेले आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या लहान बालकांच्या मनोवृत्तीवर सदर हॉटेल किंवा बार मधील दारूड्यामुळे विपरीत परिणाम होवून येणारी भावीपिढी बरबाद होईल. तसेच लहान मुले खेळापासून वंचित राहतील. सदर हॉटेल हे भरवस्तीत असून सदर हॉटेल ज्या इमारतीत सुरू आहे त्या इमारत सुरुवातीला निवास केलेला आहे की नाही? याबद्दल माहिती नाही सदर बारच्या आजबाजुच्या घरी राहणाऱ्या सभ्य नागरिकाची सदर बार मुळे कोंडी होऊन सदरचे बारच्या ग्राहक हे अश्लिल भाषेत बोलतात त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकाना अश्लिल भाषेला तोंड दयावे लागेल व आपले घराबाहेर निघणे कठीण होईल

हरेन्द्र अँडरसन यांनी जे हॉटेल सुरू करीत आहे त्याची करआकारणी ही त्याचे वडील हरेन्द्र अहस्कर यांचे नावाने असून त्याचा मा.क्र. १४६/१५८४ हा आहे जेंव्हा की सदर करआकारणी ही प्रथमतः निवासाची होती. त्यानंतर सदर अर्जदाराने संदर करआकारणी ही मुख्याधिकारी यांचे दि. २५१०.२०२१ चे आदेशान्वये मोका तपासणी नुसार नविन करआकारणी ही ‘हॉटेल’ असे नमुद करून मिळविलेली आहे. जेव्हा की हॉटेल ची परवानगी काढण्याकरिता केलेले परिवर्तन आहे. परंतु कदाचित तसा अर्ज न करता संगनमताने सदर करआकारणी ही कोणत्याही प्रकारची जाहिर सुचना न काढता देण्यात आलेली आहे असे दिसते. करिता सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचारी यांचेवर दंडात्मक कारवाई करून सदर दिलेली करआकारणी ही रद्द करावी व कुठल्याही प्रकारचे हॉटेल काढण्याकरिता परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी नगरसेविका दिपाली किशोर टिपले यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.

Previous articleब्रेकिंग:- आपल्या दोन मुलांना विष पाजूनहत्या करणाऱ्या पित्याचीहीआत्महत्या ?
Next articleमनसे वार्ता :- मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा सुधारित विदर्भ दौरा कसा असेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here