Home Blog Page 206

महिला बचत गटाच्या उत्पादन विक्रीसाठी जिल्ह्यात व्यापारी संकुल उभे करणार

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या माध्यमातून महिला बचत गटांची मोठी शक्ती आज जिल्ह्यात उभी झाली आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ग्राहक मिळावे, यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र या बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी ग्राहक मिळावा, यासाठी जिल्ह्यात सुंदर, अप्रतिम आणि आकर्षक असे व्यापारी संकुल उभे करणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चांदा क्लब ग्राउंड येथे विभागीय सरस व हिराई महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रतिभा धानोरकर, किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मरुगानंथम एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे आदी उपस्थित होते.

राज्याचा अर्थमंत्री असताना सन 2018 – 19 मध्ये अर्थसंकल्पात महिला बचत गटांसाठी जिल्हास्तरावर व्यापारी संकुलाची संकल्पना आपण मांडली होती, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कृषी विभाग किंवा जुबली हायस्कूलच्या संभावित जागेवर बचत गटाच्या उत्पादित माल विक्रीसाठी व्यापारी संकुल तयार करण्यात येईल. जबरदस्तीने कोणतीही वस्तू आपण ग्राहकांवर थोपवू शकत नाही, हा बाजाराचा स्वभाव आहे. आपल्या वस्तूमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असले तरच ग्राहक त्याकडे आकर्षित होतात. उत्पादन निर्मितीचे हे वैशिष्ट्ये आणि कौशल्य विकसित करण्यासाठीच चंद्रपुरात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र आपण उभे करीत आहो. या विद्यापीठाच्या माध्यमातून महिलांना वस्तू निर्माण करण्याचे चांगले तंत्रज्ञान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाने कालच महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे एसटी बसमध्ये सर्व महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळणार आहे. महिलांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अद्भुत गुण असतात. आपल्या समाजात स्त्री शक्तीचा नेहमी सन्मान केला जातो. स्त्रियांमध्ये सहजभाव व प्रेमभाव ठासून भरलेला असतो. सोबतच आपल्यावर कोणाचीही कर्ज राहू नये, असा स्वाभिमान महिलांमध्ये आढळतो. त्यामुळेच महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण 99 टक्के आहे. उद्योग, व्यापार, व्यवसायाचा पराक्रम दाखविण्याची संधी या महोत्सवातून महिलांना मिळणार असून चंद्रपूरचा गौरव वाढवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून 75 मैदाने विकसित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ‘खेलो चांदा अभियानाचे’ सुद्धा उद्घाटन झाले, असे त्यांनी सुरुवातीला घोषित केले. येथे सादर करण्यात आलेले लेझीम नृत्य, आदिवासी नृत्य अतिशय उत्कृष्ट होते. महिलांना नाविन्यपूर्ण कार्य करण्याची शक्ती देवाने दिली आहे. उमेदच्या महिलांच्या मानधनासंदर्भात मुंबईत सचिव स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही सुद्धा पालकमंत्र्यांनी दिली.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ‘खेलो चांदा अभियानाच्या’ लोगोचे अनावरण आणि नवरत्न स्पर्धा पुरस्काराचे वाटपही करण्यात आले. यात आदेश बनसोड (कथाकथान स्पर्धा), वेदांत निमगडे (वादविवाद), गुंजन गडपल्ले (स्मरणशक्ती), वैष्णवी फुंडे (सुंदर हस्ताक्षर), रहितखान पठान आणि परशुराम डाहुले (बुद्धिमापन) आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रामू वाढई, निखिल उकडे, विलास वन्नेवार आणि बापूजी अडबाले यांना ई – रिक्षा वाटप करण्यात आले.

प्रत्येक क्षेत्रात महिला उमटवीत आहेत कर्तुत्वाचा ठसा – सपना मुनगंटीवार

 

नवजीवन महिला योग समिती तर्फे जागतिक महिला दिन साजरा

 

चंद्रपूर,दि. १८ : प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीयांनी उज्ज्वल कामगिरी गाजविली आहे. एक प्रेमळ मुलगी, आई, बहीणीपासून सुरू झालेला तिचा प्रवास सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तुत्वाचा यशस्वी ठसा उमटवीत आहे. मिळालेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संधीचे सोने महिला करत आहे. असे प्रतिपादन सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

नवजीवन महिला योग समिती तुकूम,चंद्रपूर तर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या, यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विजय चंदावार, प्रमुख अतिथी श्रीमती गंगुबाई जोरगेवार, डाॅ. कल्पनाताई गुलवाडे, डाॅ. शर्मीलाताई पोद्दार, डाॅ. मुंधडा, शरद व्यास, रमेश ददगाड, सुभाष कासनगोट्टूवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, संजीवनी कुबेर, संगीता चैव्हाण, वैजंती गहूकर, अक्षता देवाळे, वनश्री मेश्राम, अरूणा शिरभैये, निलिमा चरडे, निलिमा गोरगीरवार, शोभा कुळे तसेच योग नंदीनी ग्रृपचे सदस्य व आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

सपना मुनगंटीवार पुढे म्हणाल्या,स्त्रीयांनी आपली संस्कृती जपत आपल्या यशस्वी कामगिरीची मोहर उमटविलेली आहे. ग्रामीण भागापासुन ते जागतिक स्तरावर महिला सर्व क्षेत्रात सक्षम झाल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

 

यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. स्वागत गीत अरूणा शिरभैये व निलिमा गोरगिरवार यांनी प्रस्तूत केले. वैजंती गहूकर व निलिमा चरडे यांनी समूह नृत्य सादर केले. आस्था शेट्टी यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवजीवन महिला योग समिती अध्यक्षा सौ. सपना नामपल्लीवार यांनी केले. तर संचालन वनश्री मेश्राम व आभार प्रदर्शन शुभांगी डोंगरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन महिला योग समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. तुकूम येथील अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे सांस्कृतिक मंत्री लाभले हे आम्हा कलावंतांचं भाग्य !

 

सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलताना तमाशा कलावंत गहिवरले

नवी मुंबई, दि १७
“महाराष्ट्रातील कलावंतांनी अनेक सांस्कृतिक मंत्री बघितले; त्यांच्याशी संवादही झाला पण हृदयापासून कलेवर आणि कलाकारांवर प्रेम करुन अत्यंत संवेदनशीलपणे या क्षेत्रातील प्रश्न समजून घेणारा, आपुलकिने विचारपूस करणारा आणि कलावंतांना भरभरून देणारा सांस्कृतिक मंत्री पहिल्यांदा बघितला. राज्यातील ग्रामीण भागात असलेला तमाशा कलावंत ना. सुधीर मुनगंटीवार यांचा शतशः आभारी राहील”, असे भावोद्गार विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कलावंतांनी काढले. बोलताना त्यांच्या हृदयातील भाव डोळ्यांतून झळकत होता. स्थळ होते वाशी नवी मुंबई येथील सुभाषचंद्र बोस मैदान, रिमझिम पावसात रात्री नऊ वाजता.
तमाशा कलावंतांचा सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. या समारंभातच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार प्राप्त तमाशा कलावंतांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. वातावरण अत्यंत भाऊक झाले असताना ढगातून रिमझिम पावसाचे थेंब टपकत होते तर या तमाशा कलावंतांच्या डोळ्यांतून अश्रुधारा..!
स्वर्गीय गुलाबबाई संगमनेरकरांच्या मुलींना तर अश्रू अनावर झाले होते. भर पावसातहीला महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित राहून केलेला हा सन्मान कधीही विसरू शकणार नाही, नियतीला हा पुरस्कार मला सुधीर भाऊंच्या हस्तेच प्रदान व्हावा असे वाटत असेल म्हणून आजचा दिवस उजाडला असे उदगार काढताना ज्येष्ठ कलावंत अताम्बर शिरढोणकर अत्यंत हळवे झाले होते.
तमाशा ही कला श्रीमंत व्हावी अशी आमची आर्त इच्छा आहे. या कलेला राजाश्रय मिळण्यासाठी आमची धडपड आहे असं सांगताना अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी राजे जाधव म्हणाले ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखा प्रतिसाद देणारा आणि योग्य निर्णय घेणारा मंत्री राज्याला अनेक वर्षांनी लाभला आहे. राज्यातील तमाशा कलावंत हा क्षण विसरू शकणार नाहीत.
शासन लोककलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे असे आणि राहिल अशी ग्वाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
ना. मुनगंटीवार म्हणाले की, पुरस्कार प्राप्त कलावंतांना ‘अ’ वर्गाचे निवृत्तीवेतनही देण्यात येणार आहे. ना. मुनगंटीवार यांचे हे वाक्य ऐकताच कलावंतांना आकाश ठेंगणे झाले. ‘सुधीरभाऊंसारखा मंत्री पुन्हा होणे नाही. आजपर्यंत आम्हा कलावंतांचा असा आदर व सन्मान केला नाही. परंतु लोककलावंतांबद्दल सुधीरभाऊंना वाटणारे प्रेम त्यांनी शब्दांतूनच नव्हे तर कृतीतून करून दाखविले’, असे कलावंत यावेळी म्हणाले.

धक्कादायक :- भद्रावतीमधे अनैतीक देहव्यापार सुरू, पोलिसांची धडक कारवाई.

दोन पिडीत महीलांची केली सुटका, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक.

भद्रावती :-

शहरातील वरोरा रस्त्याकडे जाणाऱ्या एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती दिनांक १५/०३/२०१६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला कळताच त्यांनी पोलीस स्टेशन भद्रावती हधीत असणाऱ्या एका ठिकाणी धाड टाकून अवैधरित्या अनैतिक देहव्यापार करणाऱ्या एका महिलेला स्वत:चे आर्थीक फायदयाकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत होती तिला अटक केली तर दोन पिडीत महिलांना सोडून देण्यात आले. ही कारवाई बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोस्टे भद्रावती आणि मंगेश भोयर सहा. पोलीस निरीक्षक स्थागुशा चंद्रपूर यांचे पथकाने केली. दरम्यान या वेश्याव्यवसायात पुन्हा किती महिला व मुली अडकल्या आहे याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी भद्रावती ते वरोरा जाणा-या रोड चे बाजुला असलेल्या शेतशिवारातील एका घरावर छापा टाकून कारवाई केली असता त्या ठिकाणी एक स्त्री तिचे आर्थीक फायदयाकरीता दोन महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत असतांना मिळुन आली. त्या महीलेस सोबतच्या महीला पोलीस अंमलदारांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन इच्छेविरूध्द देहव्यापार करवुन घेत असलेल्या दोन्ही पिडीत महीलांची सुटका करण्यात आल्याने न्यायालयाने आदेशाने त्या महिलाना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

अनैतिक देहव्यापार करवुन घेत असलेल्या महीले विरुध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमाक १२४/२०२३ कलम ३७० भा.दं.वि. सह कलम ३, ४, ५ अनैतीक मानवी व्यापार (प्रतीबंधक) अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नोद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन भद्रावती करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, स्थागुशा चंद्रपूर, पोलीस निरीक्षक श्री बिपीन इंगळे, पोस्टे भद्रावती, सहायक पोलीस निरीक्षक श्री मंगेश भोयर स्थागुशा चंद्रपूर, स्थागुशा पोलीस अंमलदार स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, चंदु नागरे, अजय बागेसर, संदिप मुळे, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे तसेच पोस्टे भद्रावती येथील पोलीस अंमलदार अनुप आस्टुनकर, विश्वनाथ चुदरी, रोहीत चिचगीरे, मोरेश्वर पिदुरकर, महीला अंमलदार सुषमा पवार, गिता उमरे, सोनु कोसरे यांनी केली.

बिनबा गेट परिसरात सुशोभीत सौंदरीकरण करा

समता संघर्ष समितीची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर-बिनबा गेट परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्याकरिता महानगर पालिकेने चौकात सौंदर्यीकरण करून जेष्ठ नागरिकाकरिता बैठक व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफान शेख यांनी केली आहे.
बिनबा गेट परिसरात प्रचंड प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या परिसरात महानगर पालिकेच्या मालकीची जागा असून ती लहान मोठ्या व्यावसायिकानी त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वार्डातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.तसेच असामाजिक तत्वांची गर्दी होत आहे. त्यावर उपाय म्हणून मनपा ने आपल्या मालकीच्या जागेत वॉल कंपाऊंड तयार करावे व तेथे सौंदर्यीकरण करावे.जेष्ठ नागरिकांकरिता बैठक व्यवस्था करावी,व्यायाम साहित्य उपलब्ध करावे, विद्युत पुरवठा करून रोषणाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या परिसरात अलीकडेच वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहे, मात्र रस्ता दुभाजक तयार केले नसल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथे रस्ता दुभाजक तयार करावी अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन सादर करताना हाजी सय्यद हारून सहाब , अय्युब खान रुस्तम खान आमिन खान, हर्षद कानमपल्लीवार, विनोद अनंतवार, मोहम्मद कादर शेख आदी उपस्थित होते.

दखलपात्र:- मनसेचा बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर धडाकला,

तर मुंबई मंत्रालयावर शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू, मनसेचा इशारा.

वरोरा:-

राज्यातील भाजप सेना युती सरकार व त्यानंतर आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजनांपासून वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास 1500 शेतकऱ्यांना वंचित ठेवले तर नियमित कर्ज भरणाऱ्या जवळापास 3500 शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन राशीपासून वंचित ठेवले आणि अतिवृष्टी (पूरग्रस्त ) अनुदान जवळपास 4 हजार शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने या सर्व शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील डॉ.आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलबंडी जनआक्रोश मोर्चा दुपारी 1.30 वाजता धडकला, त्यात महिला व पुरुष शेतकऱ्यांनी भजन सादर करून सरकार जागे करण्याचा प्रयत्न केला, या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी व मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मनसे तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भाजप सेना युतीने सन २०१७ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी दिनांक १.४.२०१२ व त्यानंतर पिक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व अश्या कर्जापैकी दि. ३०.६. २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना काही निकषाच्या अधिन राहून सरसकट कर्जमाफीची घोषणा केली व जे नियमित कर्ज फेडणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये जाहिर करण्यात आले. दरम्यान ज्या बँक खात्यात शेतकऱ्यांचे खाते होते त्या बँक शाखेत शासनाकडून निधी जमा करण्यात आला नसल्याने त्या बँकेने शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे निकालीत न काढता त्यांनी सरकार कडून निधी आला नसल्याने तुमची कर्जमाफी किंवा कर्ज माफ होवू शकत नाही असे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले. दरम्यान चंद्रपूर जिल्हयातील वरोरा भद्रावती तालुक्यातील जवळपास १५०० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. भाजप सेना युतीच्या सरकार नंतर महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेत्रुत्वात राज्यात आले व त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना मार्फत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा केली परंतु त्या वेळी सुद्धा सन २०१७ मधील कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या गेली नाही पर्यायाने शासनाने एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असून आता तर बैंक कडून शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जाच्या नावाखाली त्यांचे बैंक खाते गोठवण्यात येत असून शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे.

सरकारच्या या फसवणुकीच्या धोरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढा उभारला आला असून वरोरा तहसील कार्यालयासमोर दोन महिन्यापूर्वी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते व अनेकवेळा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क करून निवेदन दिले शिवाय अनेकवेळा मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राचार केला पण अजूनपर्यंत शासन प्रशासनाकडे निवेदने व तक्रारी दिल्यानंतर सुध्दा या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिनांक 15 मार्चला शेतकऱ्यांचा बैलबंडी जनआक्रोश मोर्चा वरोरा तहसील कार्यालयावर काढला असून त्याची आपण वेळीच दखल घेऊन आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपिठ औरंगाबाद यांचा दिनांक २७/०९/२०२२ रोजी याचिका क्र. ९८०८/२२, भाऊसाहेब पारखे व इतर विरुध्द महाराष्ट्र सरकार व इतर या केसमध्ये पारित केलेल्या आदेशाच्या अधीन राहून शेतकऱ्यांना कर्जमाफी व प्रोत्साहन राशी द्यावी अशी विॅनती करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना सन २०१७ नंतर कर्ज सन २०१९ पर्यंत तसेच राहिल्याने संबंधित शेतकऱ्यांना नविन कर्ज मिळाले नाही. पर्यायाने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नसल्याने स्वतःची शेती पडीत ठेवावी लागली ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान सन २०१९ मध्ये ठाकरे सरकार (महाविकास आघाडी) अस्तित्वात आले आणि या सरकारने सुध्दा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली. या योजनेत आपण पात्र ठरू या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली व आपली व्यथा स्थानिक प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र तत्कालिन अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्याकडे नियमित पाठपुरावा केल्यानंतर सुध्दा कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे जवळपास पाच वर्षापासून वंचित शेतकऱ्यांची शासन प्रशासनाकडे पायपिट सूरू आहेत.

तर मुंबईच्या मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन.

खरं तर हे राज्य शिवछत्रपतींच्या नावाने चालवतो असा आशावाद आपण जनतेला दाखवून त्यांच्या नावाच्या योजनेचाच जर बटटयाबोळ करत असाल तर आपण खऱ्या अर्थाने शिवछत्रपतीच्या नावाचा गैरवापर करतो हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित देऊन त्यांची कर्जमुक्ती करावी व शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहन राशी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना त्वरित निधी द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा भद्रावती या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मुंबई च्या मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे पदाधिकारी सुनील गुडे, रमेश कालबान्दे, किशोर माडगूळवार,राम पाचभाई, गजू वादाफळे, श्रीकांत तळवेकर, राजेंद्र धाबेकर प्रतीक मुडे, कुलदीप चंदनखेडे, विवेक धोटे, प्रकाश नागरकर, युगल ठेंगे, जयंत चौधरी, धनराज बाटबारवे, प्रकाश धोपटें, मनोहर खिरटकर, मनोज बोरेकर, नामदेव घूडे, दिलीप डोहतळे, उत्तम चिंचोलकर,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रेवती इंगोले, शहर अध्यक्षा पौर्णिमा शेट्टी, ज्योती मुंजे, शुभांगी मोहरे, अनिता नकवे व असंख्य महाराष्ट्र सैनिक व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय दंड संहिता 1860 की धारा 307 के आरोपी संदीप आडवाणी जेल रवाना

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर:– चंद्रपुर शहर के जटपुरा गेट के पास सोनी मार्केटिंग के बाजू में आनंद | वाईन शॉप के मालक संदीप आडवाणी और ग्राहक दिलीप लक्ष्मण नरवाडे के बीच पैसे को लेकर वाद विवाद हुआ. जिसके बाद संदीप आडवाणी द्वारा अपना आपा खोकर ग्राहक लक्ष्मण के सिर पर कांच की बोतल दे मारी. सिर पर कांच की बोतल लगने से लक्ष्मण को गंभीर चोट आई कुछ लोगों द्वारा लक्ष्मण को श्वेता हॉस्पिटल ले जाया गया. जहां पर डॉक्टर द्वारा उसे ICU में भर्ती कराया गया. रामनगर पुलिस स्टेशन में मामला पहुंचा रामनगर पुलिस द्वारा आरोपी संदीप आडवानी के विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 की धारा 307 के अंतर्गत अपराध दर्ज किया गया तथा मा. न्यायाधीश के सामने PCR के लिए पेश किया गया. मा. न्यायाधीश द्वारा आरोपी को जेल रवाना किया गया है.

नाले सफाई करणा-र्या कामगारांना कामावरुन कमी करु नका – आ. किशोर जोरगेवार

अधिवेशनात केली मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर:-  चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत नाले सफाईचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदार मार्फत 50 टक्के कामगारांची कपात केल्या जणार आहे. त्यामुळे जवळपास 106 अस्थायी कामगार बेरोजगार होणार आहे. ही बाब गंभीर असुन नाले सफाई करत शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या एकाही कामगाराला कामावरुन कमी करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलतांना केली आहे.

मनपा क्षेत्रातील नाले सफाई नियमीत करण्यासाठी 206 अस्थायी कामगार काम करत आहे. मात्र आता जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट संपल्याने नवा कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने कामगारांच्या संख्येत 50 टक्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास 106 कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.

हा मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करत कामगारांच्या व्यस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, गेले अनेक वर्ष 206 कामगार नाले सफाईचे काम करत आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेचे नाले सफाईचे कंत्राट आता नविन ठेकेदाराला मिळाले असुन केवळ 100 कामगारांना कामावर घेऊन काम करण्याचा या नव्या ठेकेदाराचा मानस आहे. चंद्रपूर महानगर पालिका मोठी आहे. येथे योग्य सफाई होत नाही. अशी नागरिकांची नेहमी ओरड असतांना 206 कामगारांच्या येवजी 100 कामगारांच्या माध्यमातुन सफाईचे काम करणे शक्य नाही. नव्या कंत्राटदाराच्या म्हणण्या नुसार कामगारांएैवजी मशनरीच्या माध्यमातुन नाले सफाई केल्या जाणार आहे. मात्र सदर कंत्राटदाराकडे अशी कोणतीही मशीन उपलब्ध नाही. अशातही मशनरीने केवळ मोठे नाले साफ करणे शक्य आहे. गल्लीबोळातील नाल्या साफ करण्यासाठी मन्युष्यबळाची गरज लागणार आहे. याचा कोणताही अभ्यास न करता कामगारांच्या संख्येत 50 टक्याने कपात करण्याचा घेण्यात आलेला निर्णय स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य नाहीच सोबतच अनेक वर्षापासून चंद्रपूर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या कामगारांच्या हिताचा हि नाही. त्यामुळे कामगारांच्या संख्येत कपात न करता 206 कामगारांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना सभागृहात केली आहे.

पत्रकारास अश्लील शिवीगाळ करणाऱ्या ग्रामसेवकानी अखेर मागितली माफी

पत्रकारास अश्लील शिवीगाळ करणाऱ्या ग्रामसेवकानी अखेर मागितली माफी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर:- सिंदेवाही तालुका महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामाच्या संदर्भात माहिती विचारणाऱ्या एका दैनिकाच्या पत्रकारास ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली असल्याने तालुक्यातील पत्रकार संघटनेने हिसका दाखवताच अखेर ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी सर्व पत्रकार बांधवांची जाहीर माफी मागितली आहे. सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय लाडबोरी येथील रहिवाशी आणि एका दैनिकात सदर प्रकार तालुक्यातील सर्व पत्रकारांना वार्तांकन म्हणून काम करीत असलेले कळविला. त्यामुळे तालुक्यातील अनेक पत्रकार सुनील गेडाम यांनी ग्रामसेवक पत्रकार सुनील गेडाम यांना सोबत घेऊन श्रीकांत वन्नेवार यांना फोन करून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे धाव घेतली. गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध आणि सदर प्रकार घडल्याची माहिती करून देण्याबाबत माहिती विचारली पोलिस विभागाला सांगितली. पोलिसांनी असता ग्रामसेवक यांनी अचानक सुनील लगेच संबंधित ग्रामसेवक यांना पोलीस गेडाम यांना अश्लील भाषेत शिवीगाळ स्टेशन मध्ये बोलाविले. आणि झालेल्या करणे सुरू केले. सुनील गेडाम यांनी प्रकाराबाबत विचारणा केली असता माझी

प्रकृती बरी नसून माझी बी. पी. वाढलेली होती. त्यामुळे माझ्या कडून अनवधनाने पत्रकार बंधूंना शिवीगाळ केली. माझे आणि सुनील गेडाम यांचे संबंध अतिशय चांगले असून यापूर्वी मी कधीच सुनील भाऊ, किंवा तालुक्यातील इतर पत्रकार बंधूंना अपशब्द वापरले नाहीत. असे ग्रामसेवक श्रीकांत नन्नेवार यांनी पोलिसांसमोर सांगितले तसेच झालेल्या प्रकाराबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंची जाहीर माफी मागत असून तसा माफीनामा सुद्धा लिहून दिला आहे. पोलिसांनी सुद्धा यावेळी ग्रामसेवक श्रीकांत नन्नेवार यांना चांगलीच समज दिली.

यावेळी पत्रकार म्हणून अमृत दंडवते, बाळू बतकमवार, महेंद्र कोवले, संदीप बांगडे, सुनील गेडाम, खालिद पठाण, मिथुन मेश्राम, आक्रोश खोब्रागडे, अमन पटेल, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू लोणारे, सचिव योगेश बारेकर, ग्रामसेवक अशोक शिंदे, वाकडे, मेश्राम, इत्यादी उपस्थित होते. अतुल

मनसेच्या पुढाकाराने उद्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा बैलबंडी आक्रोश मोर्चा.

बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार.

वरोरा :-

जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मधे पात्र लाभार्थी म्हणून निवड झाली असताना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50 हजार प्रोत्साहन राशी मिळाली नाही तर 3 हजार शेताकऱ्यांना ओला दुष्काळ व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून काही बैंक व्यवस्थापकांनी शेताकऱ्यांना नोटीस पाठवून कर्ज भरा अन्यथा तुमचे बैंक अकाउंट शील करू अशी धमकी दिली आहे तर काही शेतकऱ्यांची बैंक खाती शील सुद्धा करण्यात आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात मोठा आक्रोश असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा पिडीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे व सध्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय व्हावा याकरिता दिनांक १५ मार्च ला बैलबंडी मोर्चातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन वरोरा मनसे तर्फे करण्यात आले आहे.

15 मार्चला होणाऱ्या या बैलबंडी मोर्च्यात मोठ्या संखेने शेतकरी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शेतकऱ्यांचे नेत्रुत्व करणारे भदुजी गिरसाळवे, मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी, गजू वादाफळे, मोहित हिवरकर, श्रीकांत तळवेकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर. संदीप मोरे, विनोद खडसंग,राजेंद्र धाबेकर, पंकज पेटकर, मनोज गाठले, युगल ठेंगे,पवन ढोके, जयंत चौधरी, धनराज बाटबरवे ,शंकर क्षिरसागर, दिलीप उमाटे, प्रतीक मुडे, मनोहर खिरटकर अनिल दोमणे, अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसुटकर, शुभम वाकडे, प्रमोद हनवते, अशोक दाते, दिनेश जुमडे, शुभम नरड, संदीप धानोरकर, राजु पवार, प्रकाश धोपटे, विष्णू मुंजे, आसिफ शेख, अनिकेत गुजरकर, महिला सेना रेवती इंगोले, पोर्णिमा शेट्टी, शुभांगी मोहरे, अनिता नकवे, ज्योती मुंजे यांनी केले आहे.