Home नागपूर सन्मान :-डॉ. अशोक जीवतोडे यांना  विदर्भ  पुरस्काराने सन्मानित  

सन्मान :-डॉ. अशोक जीवतोडे यांना  विदर्भ  पुरस्काराने सन्मानित  

 विदर्भाच्या मुद्द्यावर प्रखर भूमिका बजावणाऱ्या डॉ. अशोक जिवतोडे यांचा नागपूर येथे झालेल्या विदर्भ सन्मान सोहळ्यात सत्कार 

प्रकाश झाडे :

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्यानंतर, समाजासाठी काही करावे या हेतूने सामाजिक सेवेत स्वतःला वाहून घेतलेले चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय समाजसेवक अशोक श्रीहरी जीवतोडे यांचा नुकताच विदर्भ सन्मान पूरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. अशोक जिवतोडे  यांना शिक्षण क्षेत्रातली खडान् खडा माहिती. त्यांच्या बोलण्यात नेहमी नवनव्या संकल्पनांची चर्चा असते. सतत काहीतरी नवीन घडविण्याच्या ध्यासाने ते भारलेले असतात. राजकारणातील त्यांचा वावर तेवढाच समर्थ आहे. पण एखाद्या आंदोलनात किंवा संवादात ते रमतात, तेव्हा ते राजकारणी अजिबात भासत नाहीत. त्यांच्यातील मैत्रभावही तेवढाच जबरदस्त. व आपण कर्तबगार आणि लोकप्रिय आहोत, याचा अनेकांना अहंकार येतो, पण अशोक जीवतोडे यांना अहंकाराचा ‘अ’देखील स्पर्शून गेला नाही.

शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, राजकारणी आणि कर्तबगार नेता, अशी ओळख मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या माणसांची साथ कधी सोडली नाही. त्यांना जवळ केले आणि टिकविले. सतत नवनवीन लोकांचा संग्रह आणि विविधतेचा ध्यास हा त्यांचा स्वभावच असावा कदाचित. त्यामुळेच त्यांनी शिक्षण क्षेत्रात पूर्व विदर्भात नवनवीन प्रकल्पांना आकार दिला आणि ते पूर्णत्वास नेले. घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी झटणारे अशोक भाऊ सर्वांनाच आपलेसे वाटतात. त्यातूनही वेळ मिळेल तेव्हा कुटुंबीयांसोबत रमतात. तरीही लोककल्याणाचा त्यांचा ध्यास काही केल्या कमी होत नाही. भाषणांमध्ये ते जेव्हा आकडेवारीसह बारीकसारीक तपशील सांगतात, तेव्हा त्यांच्या स्मरणशक्तीची दाद दिल्याशिवाय श्रोते राहात नाहीत. लोककल्याणाच्या त्यांनी घेतलेल्या ध्यासाचे समाधान वाटते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज (दि. ३०) ला स्थानिक रेजंटा सेंट्रल हॉटेल अँड कन्व्हेशंन सेंटर येथे त्यांना विदर्भातील ओबीसी व विदर्भ विकास चळवळीतील नेते, शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील अग्रणी म्हणून सामाजिक कार्यासाठी अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्या हस्ते विदर्भ सन्मान पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

सोहळ्यात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिदेशक संदीप पाटील यांचेसह विविध शासकीय विभागातील मुख्य अधिकारी व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here