Home चिमूर उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या

उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात घ्या

खासदार बाळू धानोरकर यांची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर : जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्या पासूनच उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत, उन्हामुळे शाळा’सकाळच्या सत्रात घ्या..! उन्हाळ्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असतो. त्यामुळे सकाळच्या सत्रात इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण | विभागाकडे केली आहे. साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्याप्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट व त्याच्या परिणामांपासून करावयाचा बचाव याबाबत उपाय आवश्यक आहे. उष्णतेमुळे होणारा शारिरीक त्रास किरकोळ ते गंभीर स्वरुपाचा असू शकतो. किरकोळ त्रासाच्या स्वरुपात शरिरावर उष्णतेमुळे रॅशेश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा त्रास असतो. गंभीर प्रकारात उष्माघात होतो. यात व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. ही स्थिती लक्षात घेता इंग्रजी माध्यमातील शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here