अडते / व्यापारी मतदार यादीचा घोळ आला समोर, सचिव देरकर यांचे नियमबाह्य कारस्थान?
कोरपना प्रतिनिधी :-
जिल्ह्यात एकीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उरला असताना दुसरीकडेमतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याच्याबातम्या समोर येत असल्याने निवडणूक प्रक्रिया वादात सापडली असल्याचे चित्र आहे, दरम्यान कोरपनाच्या 18 संचालकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती व मतदार यादी अंतिम प्रसिद्धी दिनांक 20 3 2023 रोजी प्रसिद्ध झाली. यामध्ये ग्रामपंचायत -762 मतदार सेवा सहकारी संघ -255 मतदार अडते व्यापारी-124 मतदार हमाल मतदारसंघ-48 अशी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र सचिव कवडू देरकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा नियम धाब्यावर ठेवून पुरवणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव दिला व जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक यांनी सात नावाची यादी पुरवणी म्हणून प्रसिद्ध केली यामुळे अडते व्यापारी मतदारसंघांमध्ये 124 ऐवजी 131 मतदार झालेले आहे, त्यामुळे कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक वादात अडकली आहे.
खरं तर नियमानुसार मतदार यादी प्रसिद्धी करतांना ती त्या संस्थांच्या जाहीर फलकांवर ठेवणे आवश्यक आहे पण निवडणूक फलकावर किंवा जाहीरपणे ती प्रसिद्ध केली नाही, नियमाप्रमाणे दोन वर्ष परवाना असावा अशा लोकांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्या जाते मात्र ज्या लोकांची नावे समाविष्ट केली आहे, त्यांचे अर्ज आवक जावक रजिस्टर मध्ये नोंद नाही नियमाप्रमाणे परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र दिलेली नाही, करार पत्र कोरे आहेत साक्षीदारांच्या स्वाक्षरी नाही व अर्ज प्राप्त 22 11 2022 ला प्राप्त झाले असे असताना अनेक लोकांची जुनी नावे गाहाळ करून नव्याने सहा महिन्यापूर्वी म्हणजे दिनांक 21 9 2022 रोजी नंद विजय शेतकरी उत्पादक कंपनी यांची नोंदणी झाली त्या कंपनीचे पाच नावाचा मतदार यादी मध्ये समावेश करण्यात आला समितीच्या दिनांक 13.1.2023 सभेमध्ये परवाना देण्याचा ठराव प्रशासकांनी पूर्ण करणे आवश्यक असताना व नियमानुसार कागदपत्र प्राप्त झाले नसताना नवीन मतदार म्हणून एकाच पक्षाचे एकाच कुटुंबाचे बँकेचे संचालक नगरसेवक नगराध्यक्ष शिक्षक अशा लोकांचा व्यापारी मतदार यादी मध्ये समावेश करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ घालण्याचा प्रकार आहे,
शेतकरी उत्पादक कंपनीच्या नियम आठ कायदा 2013 शेडूल18 नुसार एका कंपनीमध्ये कायद्याने कुटुंबातील पाच व्यक्ती राहता येत नाही असे असताना सचिवाने रजिस्ट्रेशन घटना न घेता एकाच कुटुंबातील सात नावाचा समावेश करण्याची उठा ठेव केली आहे, नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा विजय बावणे यांनी केविलवाना प्रयत्न करून अनेकदा बोगस मतदारांच्या भरोशावर निवडणुका लढण्याचा रडकी डाव केला होता मात्र सहकार क्षेत्रामध्ये निवडणूक आयोग आणि सहकार क्षेत्राच्या कायद्यात मोठी तफावत असल्याने कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादी मध्ये अनेक नावं गहाळ असताना नियमबाह्य एकाच परिवाराच्या नावाची पुरवणी यादी समावेश करण्यामागे सचिव देरकर यांचे काय हित आहे हे कळलेला मार्ग नाही, दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये सचिवांनी केलेली घुसखोरी व बोगस मतदार पात्र ठरवल्याने उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांमध्ये अनेक गंभीर प्रकार व नियमबाह्य कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सुरू असल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे बोगस मतदार वगळण्याकरिता लेखी तक्रार पुराव्यानिशी शेतकरी संघटनेचे सुनील बावणे यांनी केली असून निवडणूक कार्यात सचिवाने केलेल्या निष्काळजी व नियमबाह्य बाजार समिती कारभार याबाबत झालेला हस्तक्षेप वाढल्याने न्यायालयाचे दार ठोटाविण्याची माहिती सुनील बावणे यांनी बोगस कागदपत्रासह पत्रकारापुढे मांडलीआहे.