Home वरोरा संतापजनक:- भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीने “आकाश बार” मालकांची पत्रकाराला धमकी ?

संतापजनक:- भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीने “आकाश बार” मालकांची पत्रकाराला धमकी ?

बार चा फलक न लावताच मद्य विक्री कशी? राज्य उत्पादन शुल्क विभागाचा राजाश्रय ?

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील खांबाडा मधील “आकाश बार” चे मालक अंजनेयलु सम्बया जोंगेनी हे अवैध दारू विक्रेते म्हणून सर्वत्र कुप्रसिद्ध असून त्यांचेवर वरोरा शेगांव यांसह इतर पोलीस स्टेशन मधे अवैध दारू विक्री बद्दल गुन्हे दाखल आहे हे सत्य असताना त्यांनी दारूबंदी उठल्यानंतर बार सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात जे स्वयंघोषणापत्र दिले त्यात त्यांनी स्वयंघोषणापत्रात माझ्यावर कुठल्याही पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल नसल्याचे नमूद केले आहे जे माहिती अधिकारात समोर आले आहे. त्यामुळे खोटे स्वयंघोषणापत्र राज्य उत्पादन शुल्क विभागात दाखल केल्याने आकाश बारची परवानगी रद्द होऊ शकते व तशी तक्रार मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्याकडे दिली आहे व त्यावरून आता या आकाश बार ची चौकशी होऊन हया बार चा परवाना रद्द होऊ शकतो. मात्र या संदर्भात भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर बातमी प्रकाशित होताच आकाश बार च्या अंजनेयलु सम्बया जोंगेनी यांनी खांबाडा येथील पत्रकारांच्या घरी जावून त्याचा मोबाईल क्रमांक घेतला व ज्यांनी बातमी छापली त्यांना मी सोडणार नाही अशी एका व्यक्तिदेखत धमकी दिली असल्याची चर्चा गावभर पसरली असल्याने परप्रांतातून येणाऱ्या लोकांनी स्थानिक मराठी माणसाच्या जीवावर धंदा करून त्यांच्यावरच हात उगारण्याची जी धमकी दिली त्याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होतं असून आकाश बार चे मालक अंजनेयलु सम्बया जोंगेनी यांच्या विरोधात पत्रकार संघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक व साहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्याकडे तक्रार देऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

आकाश बार च्या इमारतीवर किंव्हा समोर कुठलेही बार बद्दल फलक नाही व बार मालकांवर अवैध दारू विक्री संदर्भात गुन्हे दाखल असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठल्या निकषांवर त्यांचे बार सुरू ठेवले हे कळायला मार्ग नसून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा त्याला राजाश्रय तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अनेकांना बिअर बार, बिअर शॉपी व देशी दारू दुकानाचे परवाने देतांना कुठल्याही अटी शर्तीचे पालन केले नसल्याने या संदर्भात विभागीय स्थरावर चौकशी संदर्भात तक्रारी दाखल आहे, अशातच आता खांबाडा येथील आकाश बार च्या नावाने कुठलीही एनओसी नाही तर हॉटेल आकाश नावांच्या रेस्टारंटला ईटिंगचा परवाना तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आला त्याला ग्रामपंचायत ची एनओसी आहे पण बार ला नाही त्यामुळं आकाश बार बेकायदेशीर आहे सोबतच आकाश बार २५/६/२०२१ पुन्हा ला सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या स्वयंघोषणापत्रात माझ्यावर कोणत्याही पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल नसल्याचे नमूद केल्याने अंजनेयलु सम्बया जोंगेनी यांच्यावर खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून त्यांचा बार परवाना रद्द होऊ शकतो. दरम्यान आता आपली पोलखोल होईल या उद्देशाने गुंड प्रव्रुतिच्या बार मालकाने पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची खांबाडा येथे चर्चा असून खांबाडा गावातील स्थानिक नागरिकांमधे भीतीचे वातावरण आहे, तर खांबाडा परिसरात बाहेर प्रांतातून येऊन दादागिरी करणाऱ्या या व्यक्तीस येथील जनता कसा सामना करेल हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here