Home राष्ट्रीय आश्चर्यजनक :- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बाबत आश्चर्यजनक खुलासे,

आश्चर्यजनक :- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या बाबत आश्चर्यजनक खुलासे,

मोदींच्या दोनवेळा जन्माचे काय आहे रहस्य ? डिग्रीबद्दल  सनसनिखेज खुलासा.

न्यूज नेटवर्क :-

भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे सार्वजनिक भाषण आणि त्यांच्या भाषणातून केलेले अनेक वेळा दावे यांचा कुठेही मेळ खात नसल्याने व त्यांच्या भाषणातून व त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ज्या पद्धतीने त्यांनी मी फार काही शिकलो नाही माझं माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मी शिक्षण सोडलं असा त्यांचा दावा केला होता मग त्यांनी बीए व एमए ची डिग्री मिळवली कधी हा संशोधनाचा भाग बनला आहे, त्यामुळं देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या डिग्रीची चर्चा राजकीय पटलावर त्यांच्या एकूण राजकीय करीयर आघात करणारी ठरत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या डिग्री बद्दल काय आहे तर्क वितर्क हे समजून घेतले तर मोदींचा जन्म दोन वेळा झाला. त्यांच्या पदवी प्रमाण पत्रानुसार यांचा जन्म 29 ऑगस्ट 1949 झाला तर त्यांच्या निवडणूक आयोगाकडे दिलेल्या नामांकन फार्म मधील जन्माची तारीख ही 17 सप्टेंबर 1950 अशी आहे.

त्यांनी वडनगर रेल्वे स्टेशनला वयाच्या 6 व्या वर्षी म्हणजे 1956 ला चहा विकला असं त्यांनी सार्वजनिकरीत्या भाषणात सांगितलं मात्र मजेची गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशनच 1973 ला अस्तित्वात आले त्यामुळं त्यांनी खरंच चाय विकला असेल कां ? याबद्दल आश्चर्य वाटत आहे.

पंतप्रधान मोदींनी मास्टर डिग्री गुजरात विद्यापीठामधून 1983 ला घेतली असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातही त्यांनी ती डिग्री एंटायर पोलिटिकल सायन्स मधून घेतली असल्याचे दिसत आहे मात्र एंटायर पोलिटिकल सायन्स असा कुठला विषयचं अभ्यासक्रमात कुठल्याही विद्यापीठात नसल्याने अशी डिग्री घेणारे मोदी देशातील एकमेव विद्यार्थी ठरले आहे. दरम्यान त्यांनी एकट्याने तो कोर्स घेतला, एकट्याने परीक्षा दिली व एकटेच पास झाले असल्याचे दिसत आहे. खरंतर त्या कोर्सला शिकवणारा प्राध्यापक किंवा परीक्षा घेणारा परीक्षक किंवा अशी डिग्री असणारा दुसरा कोणताही विद्यार्थी अजूनपर्यंत कोणालाच माहीत नाही, अगदी माहिती अधिकाराला देखील. याबाबत खुद्द गुजरात विद्यापीठाला असा कोर्स होता हे 2014 ला जनतेला समजले. पण गुजरात विद्यापीठाला असा कोर्स होता हे अजूनही त्यांनाच माहिती नाही असा उपरोधिक टोला विरोधक मोदींना मारत आहे.

पंतप्रधान मोदींचे 1978 चे दिल्ली विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र संगणकावर टाईप केलेले आहे. परंतु 1988 पर्यत दिल्ली विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र हाताने लिहीलेली असत, संगणकाचा वापर तो पर्यंत होत नव्हता. मात्र 1978 सालीच मोदींना प्रमाणपत्र संगणकाच्या प्रिंटरवर प्रिंटिंग होऊन मिळाले तेही मायक्रोसॉफ्टने 1992 च्या फॉन्ट मध्ये लिहिलेले हे आश्चर्यजनकच आहे. विशेष म्हणजे त्यावर ची तारीख पाहिली तर प्रमाणपत्र सुद्धा रविवारी कार्यालयीन सार्वजनिक सुट्टी च्या दिवशी प्रिंट केलेले मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here