वरोरा येथील अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, व माजीसैनिक संघटना वरोरा, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर यांचेकडून, शहीद स्मारक परिसर वरोरा इथे सामूहिक श्रध्दांजली.
वरोरा :-
भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ ला १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ल्यात शेकडो निरपराध लोकांचे प्राण गेले तर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले. तो दिवस एक भयानक आठवण म्हणून कायम स्मरणात राहिलं अशा किंकाळ्या, आक्रोश व चेंगराचेंगरीचे भयावह चित्र अंगावर शहारेयेईल अशीच स्थिती होती त्या घटनेला १५ वर्ष झाली आहे. तो दिवस परत पुन्हा येऊ नये आणि त्या दहशतवादी हल्ल्यात म्रुत्युमुखी पडलेल्या सगळ्या सुपुत्राना परमेश्वर शांती देवो यासाठी देशात सर्वत्र श्रद्धांजली चा कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम वरोरा येथील अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, व माजीसैनिक संघटना वरोरा, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर यांचेकडून, शहीद स्मारक परिसर वरोरा सामूहिक तर्फे सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, व माजीसैनिक संघटना वरोरा, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर यांचेकडून, शहीद स्मारक परिसर वरोरा इथे सामूहिक श्रध्दांजली देण्यात आली.सर्व प्रथम आँननरी कॅप्टन मा. वामन निबृड आणि प्रतिष्ठीत नागरिक श्री अमन मोरेश्वर टेमूर्डे यांनी शहिद स्मारकवर पुस्पचक्र वाहून मानवंदना दिली आणि एअर व्हेटरन डी एन खापने यांच्या नेतृत्वात उपस्थित माजीसैनिक रमेश आवारी .सागर कोहळे. वसंतराव काकडे. देवराव राऊत. गजानन उपरे. सुरेश बोभाटे .ऋषी मडावी. रुपेश कुतरमारे.दौलत ढोके. प्रकाश चिकटे. गणेश धोबे.गणेश मडावी. योगेश ठेंगणे.यांनी सामुदायिकपणे श्रध्दांजली अर्पण केली.