Home क्राईम स्टोरी क्राईम :- वणी तालुक्यातील मौजा-शिंदोला-२ घाटातून बेकायदेशीर रेती वाहतूक व विक्री.

क्राईम :- वणी तालुक्यातील मौजा-शिंदोला-२ घाटातून बेकायदेशीर रेती वाहतूक व विक्री.

डेपो धारक मो. इमरान बेग, आमिर ट्रेडलिंक गडचांदुर यांच्यावर वणी तहसीलदार यांचे विशेष प्रेम का?

वणी ( घुगगूस ):-

यवतमाळ जिल्हयातील वाळूगटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मीती व व्यवस्थापन करण्यासाठी ई- निविदा सूचना मौजा-शिंदोला-२, ता.वणी याबाबत काढली खरी पण ज्या मो.इमरान बेग, आमिर ट्रेडलिंक गडचांदुर यांना हे डेपो मिळाले त्यांनी डेपोवर एक ब्रास रेती सुद्धा जमा केली नसताना वणी तहसीलदार यांची कृपादृष्टी असल्याने खुल्या बाजारात दररोज 50 रेतीच्या गाड्या विकून लाखों रुपयाची रेती गायब केल्या जातं आहे, दरम्यान निविदेच्या अटी व शर्ती याची कुठलीही पूर्तता केली नसताना त्यांना रेती घाटातून रेती उत्खनन व वाहतूकीची परवानगी वणी तहसीलदार यांनी का दिली? व ह्या रेती घाटावर जाऊन ते निरीक्षण का करत नाही हा गंभीर प्रश्न असून डेपो धारक व तहसीलदार हे राष्ट्रीय संमतीची चोरी करत असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायला हवा अशी चर्चा सुरु आहे.

डेपो धारक मो. इमरान बेग, आमिर ट्रेडलिंक गडचांदुर यांना पैनगंगा नदीतील मौजा-शिंदोला-२,घाट व डेपो मिळाले आहे, वैनगंगा नदी पात्रातून उत्खनन हे मनुष्यबळाद्वारे रेती उत्खनन करायची परमिशन असताना ते मात्र पोकलेन द्वारे रोज ५० टिप्पर ने उत्खनन करून खुलेआम मार्केट मधे विक्री करत आहे, आश्चर्यांची बाब म्हणजे सदर घाटातून डेपोवर एकपण ट्रीप अद्यापही पडलेली नाही व सदर डेपो चाघरकुल बांधकाम लाभार्थ्याला लाभ मिळाला नाही, दरम्यान हे सर्व अवैध रेती तस्करी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली व आर्थिक देवाणघेवाण करून सुरू असून या संदर्भात रेती तस्करीवर पालक मंत्री महोदयांनी लक्ष घालून गरीब घरकुल धारकांना रेती मिळवून द्यावी अशी मागणी होतं आहे.

काय आहे निविदेच्या अटी व शर्ती?

वाळू गटातून वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतुक याबाबत अटी व शर्ती

१) वाळू गटातून वाळुचे उत्खनन केवळ मनुष्यबळाच्या सहायाने अनुज्ञेय राहील. तसेच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जवाबदारी निविदाधारकाची राहील.

२) निविदेचा कमाल कालावधी ३० सप्टेंबर २०२४ (हा पर्यावरण अनुमती मध्ये निर्धारीत केलेल्या कालावधीनुसार असेल) अथवा निर्धारीत केलेला वाळूचासाठा पूर्ण उचल होई पर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here