Home वरोरा ब्लास्ट :- बांधकाम अभियंता शिंगरे यांच्यासोबत कंत्राटदार बसंतसिंग यांचं साटलोटं ?

ब्लास्ट :- बांधकाम अभियंता शिंगरे यांच्यासोबत कंत्राटदार बसंतसिंग यांचं साटलोटं ?

कंत्राटदार बसंतसिंग यांचे कोट्यावधीची रस्ते बांधकामे निकृष्ठ दर्जाचे, पण अभियंता शिंगरे काम सुरु झाल्यापासून मोका चौकशीतून गायब?

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातचं नव्हे तर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाची कामे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या शिफारशीच्या माध्यमातून घेऊन निकृष्ट दर्जाची कामे करणारे कंत्राटदार बसंतसिंग यांची वरोरा तालुक्यात वंधली, निलजई, आमडी बोरी व सोईट या रस्त्यांची व माढेळी ते नागरी रोड च्या काही किलोमीटर जी रस्ते बांधकामे सुरु आहेत, त्या रस्ते बांधकामात वापरली जाणारी साहित्य निकृष्ट दर्जाची असल्याने ती रस्ते बांधकामे महिन्याभरातच उखडणार असल्याची स्थिती दिसत आहे, दरम्यान सरकारने कोट्यावधी रुपये ज्या रस्ते बांधकामासाठी खर्च केले ते रस्ते जर दिलेल्या ईस्टीमेट नुसार बांधले जात नसतील तर ते बांधकाम टिकणार कसे? व जनतेच्या पैशाची ही कसली उधळपट्टी? हे प्रश्न उभे राहत असून ह्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पैसे वसुल करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी होतं आहे, मात्र या सर्व प्रकरणात  शिंगरे हे बसंतसिंग यांचेकडून रस्ते बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी होतं नाही व ते काम सुरु झाल्यापासून एक दोन वेळाच गेले असतील अशी माहिती आहे, नियमानुसार त्यांना दररोज कामाच्या स्थळी भेट देणे आवश्यक आहे पण कंत्राटदार बसंतसिंग यांना त्यांनी खुली सूट दिली आहे, त्यामुळेच रस्ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे होतं आहे, त्यामुळे या प्रकरणात अभियंता शिंगरे यांच्यावर विभागीय चौकशी करून निलंबनाची कार्यवाही व्हावी अशी मागणी होतं आहे.

वरोरा भद्रावती तालुक्यात जी अनेक रस्ते बांधकामे सुरु आहेत, त्यात बसंतसिंग या परप्रांतीय कंत्राटदार यांची कोट्यावधीची कामे सुरु आहेत, दरम्यान स्थानिक मराठी कंत्राटदार यांना काम मिळत नाही आणि बसंतसिंग या परप्रांतीय कंत्राटदाराला स्थानिक लोकप्रतिनिधिचा राजाश्रय मिळाला असल्याने काम मिळत आहे व ते काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होतं आहे शिवाय जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांसह पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत काम सुरु असलेल्या या विभागाच्या अभियत्यांना टक्के देऊन गप्प केले जात असल्याने कंत्राटदार बसंतसिंग यांची दादागिरी वाढली आहे, ही दादागिरी मोडीस काढण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी रस्त्यावर उतरून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व शिंगरे सारख्या भ्रष्ट अभियंत्या विरोधात आंदोलन करण्याची जनतेकडून मागणी होत आहे.

रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार बसंतसिंग यांच्यावर कार्यवाही करू- शिंगरे 

वंधली निलजई आमडी सोईट हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत येत असून या कामात jar गैरव्यवहार झाला आणि काम निकृष्ट दर्जाचे झाले तर त्याची जबाबदारी कंत्राटदार यांची असतें आणि मी त्या कामात देखरेख करत असतांना जर कुठे निकृष्ट दर्जाचे काम झाले हे आढळले तर कंत्राटदार यांच्यावर निश्चितपणे कार्यवाही करू असे आश्वासन कनिष्ठ अभियंता शिंगरे यांनी दिले आहे. आता खरोखरच या रस्ते बांधकाम प्रकरणी कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही होईल का? आणि या ठिकाणचे रस्ते मजबूत बांधले जातील का? याबद्दल येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here