अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
नागपूर :- शिस्तीच्या नावाखाली एखाद्या वाहनाच्या किमती पेक्षा दाम दुप्पट दंड वसूल करून सर्वसामान्य वाहतूकदारास जीवन जगने कठीण केल्याबद्दल तसेच आर टी ओ कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या विचित्र निर्णया विरोधात आज नागपुरातील संविधान चौकात दंड नको फाशी द्या या शीर्षकाखाली नारे निदर्शने करण्यात आली .
मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे यांच्या तसेच असंख्य वाहतूकदार व मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलना नंतर नागपूर चे नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (R T O) श्री.किरण बिडकर यांना प्रत्यक्ष भेटून तसेच विस्तृत चर्चा करून अनेकांना भेडसवणाऱ्या समस्यांचे निवेदन दिले, वाहनाच्या फिटनेस प्रमाण पत्राचे शुल्क 600 रुपये आहे,
मात्र विलंब शुल्काची रक्कम एक लाख 36 हजार पर्यंत जाते ,विलंब झाल्यास दंड जरूर घ्यावा पण एवढीही रक्कम असू नये की त्यापेक्षा वाहनाची किंमत कमी राहील,वाहनाच्या परवान्यासाठी आय टी डी आर या खाजगी संस्थे काम देऊन काहींच्या घश्यात पैसे ओतण्याचा डाव आहे तो बंद करावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे,बिडकर साहेबांनी मागण्या योग्य असून यावर नक्कीच विचार करू असे सकारात्मक आश्वासन दिले,
यावेळी हेमंत गडकरी,व सचिन धोटे यांच्यासोबत शहर सचिव घनश्याम निखाडे प्रशांत निकम ,प्रभुदास डोंगरे, संदीप धांडे ,अभय व्यवहारे, गजानन टिपले ,योगेश चौरसिया,पंकज खीच्ची ,अमर भारद्वाज, लवकुष साहू,नितेश यादव,राम मंडवगडे,यांच्यासह अनेकांचा शिष्टमंडळात समावेश होता