Home लक्षवेधी जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त : बंडू खारकर

जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त : बंडू खारकर

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

वरोरा तालुक्यातील बोर्डा, मोहबाळा, दहेगाव, डोंगरगाव, चिकनी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप

चंद्रपूर  :-  दि,12/08/2024,विद्यार्थ्यांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. विद्यार्थ्यांवर पडलेल्या अशा छोट्या-छोट्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि स्वावलंबन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतात असे मत सामाजिक कार्यकर्ते बंडू खारकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील बोर्डा, मोहबाळा, दहेगाव, डोंगरगाव, चिकनी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप करण्यात आले.

पुढे बोलतांना ते म्हणाले दिनेशभाऊचे हे कार्य अभिमानास्पद आहे. गरीब मुलाच्या मदतीला ते नेहमी धावून येतात. त्यांना सहकार्य करतात. ते म्हणाले मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. आपण त्यांच्यावर योग्य वयात संस्कार दिले तर त्यांना गोष्टींची जाणीव होईल.
वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका वंदना सरसाकडे, शिक्षिका विजया शेंडे, शाळा समितीच्या अध्यक्ष्या वंदना परचाके, गावातील प्रतिष्ठित प्रशांत डाहुले यांची उपस्थिती होती.

मोहबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका सुनीता गायकवाड यांची तर गावचे सरपंच नंदू टेमुर्डे, गावातील प्रतिष्ठित प्रशांत मडावी, रमेश ढवस, मारोती पिपळशेंडे, अशोक खोडे यांची उपस्थिती होती.

दहेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका चंद्रकला जीवतोडे (सातपुते), शिक्षिका निर्मला येंसांबरे, जयश्री मेश्राम, शिक्षक अभय कावळे, दिलीप घराटे, गावातील प्रतिष्ठित सुरेंद्र खिरटकर, मनोहर आत्राम, यांची उपस्थिती होती.

डोंगरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापिका विद्या मुरांडे, शिक्षक बोरकर सर, पेंदोर सर, शिक्षिका माथानकर, शिक्षिका वाढई, गावातील प्रतिष्ठित प्रदीप आपटे, चिकनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापिका संगीता बोमनवार, शिक्षिका विद्या चौधरी यांची तर चिकनी येथील किसान विद्यालयात शाळेचे मुख्याधापक पिपळशेंडे सर, भारशंकर सर, जीवतोडे सर, आदींची यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here