Home वरोरा गंभीर :- वीज मंडळाच्या अलगर्जीपणामुळे बैलाचा करंट लागून मृत्यू तर महिला जखमी 

गंभीर :- वीज मंडळाच्या अलगर्जीपणामुळे बैलाचा करंट लागून मृत्यू तर महिला जखमी 

जामगांव येथील दुर्दैवी घटना बळीराजाचे एक लाखाचे नुकसान, नुकसान भरपाई कोण देणार?

वरोरा:- 

जामगांव( बुर्ज) येथील पशुपालक शेतकऱ्याचे बैल शेतात चराई करीत असताना लाईन फेस टू फेस झाल्यानें जिवंत गार्डिंगचा गुंडाळा जमिनीवर असल्यामुळे एका बैलाला विद्युत झटका बसला आणि जागीच मृत्यू झाल्याची घटना 16 आगस्ट ला दुपारी 4 वाजता घडली.पीडित शेतकरी लक्ष्मण परसराम घागी यांच्या मालकीचा मृतक बैल असून बैलासह शेतकऱ्याची सुनबाई सविता एकनाथ घागी हिलाही जिवंत विद्युत तारांचा झटका बसला असून ती किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. तिला उपचारर्थ उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भरती केले. तेथील डाक्टरांनी उपचार करून सुट्टी दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाही तर बैलासह महिला सुद्धा प्राणाला मुकली असती.

शेतकऱ्यांचा शेतीचा हंगाम सुरु आहे, पिकांची डवरणी सुरु असून एक बैलाचा मृत्यू झाल्यामुळे पीडित शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.विद्युत महामंडळाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून वरिष्ठाशी त्यांनी केल्याची माहिती आहे. दरम्यान बैलाचा मृत्यू हा विद्युत मंडळाच्या अलगर्जीपणामुळे झाल्याने पिडीत शेतकऱ्यांनी वरोरा पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार दिली आहे, घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलीस विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळावर तसोनतास उलटल्यानंतर सुद्धा पोहचले नव्हते ashi माहिती आहे.

विद्युत मंडळाचा गार्डिंगचा गुंडाळा जमिनीवर पडून नसता तर विद्युत झटक्याने माझा महागड्या बैलाचा मृत्यू झालाच नसता.आणि माझी सुनबाई जखमी झाली नसती.विद्युत महामंडळाची निष्काळजी आणि हलगर्जीपणा चे प्रायश्चित माझ्या बैलाला मिळाले आहे. विद्युत महामंडळ प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी.

लक्ष्मण घागी
पीडित शेतकरी, जामगांव (बुर्ज ), ता. वरोरा, जिल्हा चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here