वरोरा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार न झाल्याने गरीब महिलेच्या मृत्यूने गावकरी गहिवरले. आरोग्य विभागाविरोधात संताप.
सर्पमित्राने साप पकडल्याच्या व्हिडीओ व्हायरलं, तो गवाऱ्या साप असल्याची माहिती
वरोरा तालुका प्रतिनिधी:- धनराज बाटबरवे
तालुक्यातील आज पिंपळगाव मारुती येथे सकाळी सात वाजताच्या सुमारास मंगला कवडू बावणे वय 47 वर्ष धंदा मजुरी ही पाणी गरम करत असताना तिला डाव्या पायाला गवाऱ्या सापाने दोनदा चावा घेतला, मात्र तिला सापाची ओळख नसल्याने मला धामण साप चावला अशी ती सांगू लागली दरम्यान तिला शेजारच्या व्यक्तीने व तीचा मुलगा यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी नेले असता तिथे डॉक्टरांनी प्रकृती बघितली व तिला सलाईन व इंजेक्शन देऊन चंद्रपूरला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले, दरम्यान चंद्रपूरला जात असताना भद्रावती जवळ पेशंटच्या हाताची सलाई निघून गेली त्यामुळं मुलगा गणेश कवडू बावणे याने आईच्या हाताला स्वतः सलाईन टोचली परंतु तिची तब्येत पुन्हा खराब वाटू लागली व तिला चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडवर ठेवले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, खरं तर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात वेळीच उपचार झाले असतें तर कदाचित त्या महिलेचा जीव वाचला, असता मात्र वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कुठलीही वैद्यकीय यंत्रणा काम करत नसल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार न झाल्याने गरीब महिलेचा मृत्यू झाल्याने गावकरी गहिवरले असून उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त होत आहे.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पूर्ण सोयी उपलब्ध नसल्यामुळे माझ्या आईचा जीव गेला कारण तिथे सर्व सोयी उपलब्ध असत्या तर वेळेवर माझ्या आईवर उपचार झाला असता व माझी आई वाचली असती मात्र वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या व्यवस्थेने माझ्या आईचा बळी घेतला व आता माझ्या परिवारावर खूप मोठे संकट आलेले आहे त्यामुळे शासनाने स्वतःची झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी आमच्या कुटुंबाला मदत करावी आणि वरोरा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या सर्व सोयी उपलब्ध करण्यात याव्या व शासनाने आरोग्य विभागाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन गोरगरिबांचे जीव वाचवावे अशी विनंती वजा मागणी मृतक मंगला बावणे यांचे पुत्र गणेश कवडू बावने यांनी शासनाकडे केली आहे.
साप पकडल्याचा व्हिडीओ होत आहे व्हायरलं.
मंगला कवडू बावणे ह्या महिलेला चावलेला साप सर्पमित्र यांनी पकडला असून तो
साप ज्या पद्धतीने पकडला तो व्हिडीओ व्हायरलं होत आहे, दरम्यान मंगला बावणे हिचा मृत्यू झाला आहे, शेवटी पकडलेला तो साप नंतर वनअधिकारी यांच्या माध्यमातून जंगलात सोडून दिल्याची माहिति आहे.