मागील वर्षात दहावी आणि बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थाना केला सत्कार
खाबांडा प्रतिनिधि
मनोहर खिरटकर
विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्य दिलेल्या भाषणानी आणि त्यांनी गायलेल्या देशभक्तिपर गाण्यानी पालक भारावले. स्वातंत्र्याचा उत्सव देशात सर्वत्र मोठया हर्ष उल्हासात साजरा केला जातो त्यात विशेष करून शाळेत साजरा केलेला उत्सव कायम स्मरणात राहत असतो, कारण या छोट्या मुलांना देशाच्या स्वातंत्र्याचं महत्व आणि त्या स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या महापुरुषांनी केलेलं बलिदान यापासून प्रेरणा मिळतं असतें अशाच भावुक वातावरणात खाबांडा येथील छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मातापालक संघाचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ वाघ,पालक प्रतिनिधि मनोहर खिरटकर, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण भोयर,सामाजिक कार्यकर्ता विजय बालपांडे,अविनाश बन उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर डी पारोधे यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्य दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले खांबाडा येथील तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण भोयर यांनी ध्वजारोहन केले व राष्ट्रगीतानी ध्वजाला सलामी व अभिवादन करून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तथा मागील वर्षात दहावी आणि बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थाना विशेष रोख बक्षीस देण्यात आले,अतिशय भावनिक वातावरणात देशाच्या स्वातंत्र्याचा हा उत्सव मनविण्यात आला, विद्यार्थ्यांच्या गायन व भाषनांनी पालक वर्ग भावुक झाले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गणिततज्ञ विजय धोटे,याच्यासह उकीनकरसर,नंदकिशोर खिरटकसर,मोहन खिरटकरसर,जुमनाके सर , महाविद्यालयाचे,शिक्षक पडवेसर जुनघरे,तथा शिक्षिका रूयारकर,वाघ ,लिपीक बबन लोडे,मोडकसर,लोडेसर इत्यादी सहाय्यक शिक्षिक तथा शिक्षेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पाचभाईसर,तर आभार पडवेसर यांनी मानले