Home वरोरा आवाहन :- पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांनो मनसेच्या राजगड जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करा.

आवाहन :- पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांनो मनसेच्या राजगड जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करा.

विमा कंपनीविरोधातील लढ्यात शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळवून देऊ, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांची ग्वाही.

वरोरा प्रतिनिधी :

वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे पदाधिकारी पुढे सारसावले आहे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील वीर सावरकर चौक येथील “राजगड” या मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात तर भद्रावती येथील ज्योती झेरॉक्स जवळील मनसेच्या “राजगड” या जनसंपर्क कार्यालयात शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ, 7/12 उतारा, पेरणी प्रमाणपत्र, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे घेऊन नोंदणी करावी असे आवाहन राजू कुकडे, उमाशंकर तिवारी, मोहित हिवरकर, भदुजी गिरसावळे, सुधाकर ठाकरे, विशाल देठे, रामा पाचभाई, प्रमोद हनवते, किशोर धोटे, प्रतिक मुडे, श्रीकांत तळवेकर, राजेंद्र धाबेकर, महेंद्र गारघाटे, धनराज बाटबरवे इत्यादीनी केले आहे,

केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व पीक विमा कंपनीच्या अडेलतट्टू भूमिकेने वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 70 टक्के शेतकरी पीक विम्याच्या लाभपासून वंचित राहिले आहे, राज्य सरकारने मागील 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाचे आलेल्या रोगामुळे जे नुकसान झाले होते त्याची सरसकट नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला आवाहन केले होते तर कापूस तूर या पिकांच्या नुकसानीची तक्रार विमा कंपनीकडे दिलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात येईल असे जाहीर केले होते, सोबतच रब्बी हंगामात चना या पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याची पण नुकसान भरपाई म्हणून पीक विमा कंपनी देईल असे जाहीर केले होते, मात्र प्रत्यक्षात जवळपास 70 टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसेच मिळाले नाही व शासन प्रशासन तारखावार तारखा देऊन शेतकऱ्यांचा अंत बघत आहे, दरम्यान या संदर्भात मनसे कडून उपविभागीय कार्यालयासमोर नुकतेच मनसेने आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र पुन्हा परत तारखा देणे सुरु आहे, आता खरीप हंगाम संपून रब्बी हंगाम सुरु होणार असतांना मागच्या वर्षीचे पीक विम्याचे पैसे जर शासन पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देत नाही म्हणून आता मनसे कडून तोडगा काढण्यासाठी पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here