Home वरोरा वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे रेल्वे गाड्या थांब्यासाठी वरोरा...

वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे रेल्वे गाड्या थांब्यासाठी वरोरा उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण.

लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष व सत्ताधारी निष्क्रियत्ता यामुळे वरोरा भद्रावती रेल्वे प्रवाशांना असुविधा दिनांक ७ ऑक्टोबर २४ पासून वरोरा उपोषण 

वरोरा –

वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे आज दिनांक ७ ऑक्टोबर २४ पासून वरोरा रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी, कोरोना संक्रमण काळात बंद केलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच अन्य महत्त्वपूर्ण अशा एकूण १२ मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकाळी ११.०० वाजतापासून उप विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे.

वेळोवेळी सनदशीर मार्गाने पाठपुरावा करूनही सत्ताधारी कायम दुर्लक्ष करीत असल्याने सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना नाहक शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून आम्ही साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. वरोरा शहर, तालुका तसेच तालुक्यालगदच्या नागरिकांच्या भविष्यकालीन सुविधेसाठी ह्या मागण्या मान्य होणे अत्यंत आवश्यक आहे. तरी आपण कृपया आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून उपोषण मंडपास भेट द्यावी व वस्तुस्थिती जाणून घेऊन आमची भूमिका योग्य वाटत असल्यास आपला पाठिंबा द्यावा असे आवाहन वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here