Home वरोरा सनसनिखेज:- वरोरा भद्रावती मतदारसंघात वातावरण टाईट, करण देवतळे यांना कोण देणार फाईट?

सनसनिखेज:- वरोरा भद्रावती मतदारसंघात वातावरण टाईट, करण देवतळे यांना कोण देणार फाईट?

शांत सुस्वभावी युवा उमेदवार म्हणून करण देवतळे यांना मतदारांची पहिली पसंती असल्याचे चित्र.

वरोरा :-

वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघात यावेळी चुरिशीची लढत होतांना दिसत असून प्रचारामध्ये आघाडी घेणारे शिवसेना बंडाखोर मुकेश जीवतोडे, अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुंटेमाटे, तिसऱ्या आघाडी चे प्रहार चे उमेदवार अहेतेशाम अली व वंचित चे उमेदवार अनिल धानोरकर, अपक्ष उमेदवार राजू गायकवाड यांना मागे टाकून आता अनेक घटकाकडून मिळतं असलेला पाठिंबा यामुळे भाजप चे करण देवतळे यांनी आघाडी घेतली आहे दरम्यान कांग्रेस च्या प्रवीण काकडे यांनी सुद्धा छलांग लावली आहे त्यामुळे वातावरण टाईट झाले असून भाजप चे करण देवतळे यांना कांग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे, शिवसेना बंडखोर मुकेश जीवतोडे व अपक्ष उमेदवार डॉ. चेतन खुंटेमाटे फाईट देणारं असल्याचे चित्र दिसत आहे, राजू गायकवाड यांनी माना समाजाच्या पाठिंब्यावर दाखल केलेली उमेदवारी ही कितपत प्रभावी ठरणार हे लवकरच कळेल पण माना समाज हा अनेक पक्षीय राजकारणात असल्याने समाज म्हणून तो एका उमेदवारांच्या पाठीशी येईल अशी शक्यता नाही, दरम्यान भाजप कडून माना समाजाचे नेतृत्व राजू दोडके सांभाळत असल्याने माना समाजाचे मतदान भाजप उमेदवाराला होईल अशी शक्यता आहे.

वरोरा भद्रावती मतदार संघात पहिल्यांदाच मतदारावर ही वेळ आली होती की उमेदवार कोण निवडायचा, कारण सामाजिक राजकीय परिपक्वता असलेला एकही उमेदवार लीड करत नव्हता तर विधानसभा निवडणुकीत सगळेच पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे, दरम्यान शिवसेना बंडखोर मुकेश जीवतोडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असतांना भाजप चे करण देवतळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा लावून प्रचारात आघाडी घेतली, कांग्रेस चे प्रवीण काकडे यांना मतदारांची पसंती नसली तरी कांग्रेस चे परंपरागत मतदान आणि शेवटच्या घडीला मतदारांना दिला जाणारा उपहार यामुळे कांग्रेस तिरंगी लढतीत आली आहे, त्यात डॉ चेतन खुंटेमाटे यांनी सुद्धा आपली रानणिती आखून प्रचारात आगेकूच केल्याने चौरंगी लढतीत उपस्थिती दाखवली आहे, यानंतर अहेतेशाम अली, अनिल धानोरकर, राजू गायकवाड आणि मनसेचे प्रवीण सूर यांनी शेवटचा जोर लावला असला तरी मुख्य लढतीत येणार का याबद्दल शंकाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here