लेआऊट धारक संतापले, ग्रामपंचायत बोर्डा सरपंच सचिवाकडे तक्रार, आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण
वरोरा प्रतिनिधी :-
शहराला लागून असलेल्या बोर्डा ह्या गावातील लेआऊट धाराकांना त्यांच्या प्लाट ची चांगली किंमत येत असतांना आता लेआऊट धारक त्यांनी राखील ठेवलेल्या खुल्या जागा पण विकायला लागले आहें, त्यामुळे भविष्यात त्या लेआऊट मधील प्लाट धाराकांना सार्वजनिक वापरासाठी जागाच शिल्लक राहणार नसेल तर मग त्यांचं सामाजिक जिवन te कसं जगू शकणार हा अत्यंत गंभीर प्रश्न असून बोर्डा येथील सव्हें क्र.१/९, परचाके ले आऊटला लागून असलेल्या सर्व्हे क्र.१/७ मधील खुल्या जागेत (Open Place) अवैध्यरित्या उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवर विरुध्द स्थानिक प्लाट धारक संतापले असल्याची माहिती आहें.
बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील सव्हें क्र.१/९, परचाके ले आऊटला लागून असलेल्या सर्व्हे क्र.१/७ मध्ये नव्याने ले आऊट मंजूर करण्यात आलेले आहे. सदर ले आऊट मध्ये सर्व्हे क्र.१/९, परचाके ले आऊटला लागून खुली जागा (Open Place) मंजूर करण्यात आलेली आहे. शासनाच्या नियमानुसार मंजूर अकृषक ले आऊट मधील खुली जागा (Open Place) म्हणून मंजूर असलेल्या जागेचा वापर स्थानीक रहीवासी यांना सार्वजनिक वापराकरीता मंजूर केली जाते. परंतु सर्व्हे क्र.१/७ मधील खुल्या जागेत (Open Place) अवैध्यरित्या मोबाईल टॉवर उभारण्यात येत असल्याची माहिती असून सदर जागेत मोबाईल टॉवर उभारणी करीता करावयाचे बांधकाम सुरु आहे.
मोबाईल टॉवर ला विरोध का?
खरं तर हा परिसर पूर्णतः निवासी परिसर असून मोबाईल टॉवर उभारणीचे बांधकाम सुरु असलेल्या जागेच्या आजूबाजूला स्थानीक रहीवास्यांची घरे आहेत. मोबाईल सेवा उपलब्ध करणाऱ्या कंपनीला टॉवर उभारवयाचे असल्यास राज्य शासन व केंद शासनाने नियमावली तयार केलेली असून त्याकरीता मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. त्यामध्ये स्थानीक स्वराज्य संस्थानी मोबाईल टॉवर उभारणीसाठी खालील बाबीचा विचार करणे आवश्यक असल्याचे नमूद केलेले आहे.
१) टॉवरसाठी जागा निवडतांना वन क्षेत्राला प्रथम प्राधान्य द्यावे.
२) व्दितीय प्राधान्य निवासी भागापासून दुर असलेल्या मोकळ्या जागेस द्यावे.
३) जेव्हा निवासी भाग टाळणे शक्य नसेल त्यावेळी तेथील मोकळ्या जागेत किंवा पार्कमध्ये त्यास लागून असलेल्या रहीवास्यांची सहमती घेवूनच टांवर उभारणीस परवानगी द्यावी.
४) टॉवर उभारणीसाठी दवाखाना, शाळा व निवासी भाग टॉवर पासून १०० मीटर क्षेत्रात येत असल्यास परवानगी नाकारावी.
५) भारत सरकार दुरसंचार विभागाने मोबाईल टॉवरसाठी अमलात आनलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार मोबाईल टॉवर हा वस्ती असलेल्या इमारतीपासून ३५ मीटर दूर असला पाहिजे, असे न करणाऱ्या कंपनीला दंड करण्याची तरतूद आहे.
६) निवासो क्षेत्रात टॉवर बसवायचा असेल तर तो फक्त इमारतीच्या वर असावा. त्या करीता सार्वजनिक इमारती किंवा मोकळ्या जागा हि पहिली पसंती असावी.
मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या किरणामुळे मानवी शरोरावर गंभीर परिणाम होतात. मनुष्य मोबाईल ध्वनी लहरीच्या अधीक संपर्कात असल्यास कॅन्सर, दुष्टी कमी होणे, चिडचिडेपणा, सतत डोके दुखणे व लहान मुलात विकृती निर्माण होते. तसेच सदर टॉवर मंजूर ले आऊट मधील खुल्या जागेत (Open Place) मध्ये उभारण्यात येत असल्यामुळे त्याठिकाणी परिसरातील रहीवास्यांची लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवासी परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यात येत असलेल्या कंपनी व्यक्ती कडून राज्य शासन व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्व व नियमावलीचे उल्लंघन झाल्यास त्याविरुध्द स्थानिक रहीवासी हे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन व राज्य / केंद्र शासन यांचेकडे तक्रार दाखल करु शकतात.
सर्व्हे क्र १७ मधील खुल्या जागेत (Open Place) उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरचे बांधकाम करतांना राज्य शासन व केंद्र शासनाव्दारे निर्गमित उपरोक्त नमूद मार्गदर्शक तत्वांचे पुर्णपणे उल्लंघन होत आहे. त्यामुळे येथील मोबाईल टॉवर चे बांधकाम त्वरित थांबवावे अन्यथा सर्व प्लाट धारक ग्रामपंचायत बोर्डा कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा प्लाटधाराकांनी दिला आहें.