भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कारासह तथा सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सत्कार.
वरोरा : –
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था व्दारा भोई समाजाच्या उन्नती करिता व विविध क्षेत्रात वावरणाऱ्या भोई समाज बांधवाना प्रोत्साहन देण्याकरिता कार्य सुरु असून चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हजारो भोई समाज बांधव एकत्र येऊन सामाजिक शैक्षणिक व अन्य क्षेत्रात वावरणाऱ्या भोई समाज बांधवाना प्रोत्साहन देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्या जातं आहें, त्याचाच भाग म्हणून दिनांक 21 जून रोज शनिवारला या संस्थेच्या विदर्भ अध्यक्षा अल्का पचारे यांच्या नेतृत्वात विदर्भस्तरीय भोई समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा तथा पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन नगरभवन, हनुमान मंदीर जवळ, वरोरा येथे सायंकाळी 5.00 वाजता करण्यात आले आहें.
या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध कार्यक्रम व उपक्रम होत असून विदर्भस्तरीय भोई समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा तथा पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन होत असतें शनिवार दि. २१ जूनला सायंकाळी ५ वाजता नगर भवन, हनुमान मंदीर जवळ, वरोरा येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे अध्यक्ष गजाननदादा साटोटे, राष्ट्रीय महासचिव, अ.भा.भो.स.से. संस्था,उद्घाटक, एकनाथजी काटकर, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.भो.स.से. संस्था, प्रमुख अतिथी खा. प्रतिभाताई धानोरकर, वणी-आर्णि-चंद्रपूर लोकसभा क्षेत्र, आ.करण देवतळे, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र, तुकाराम वानखेडे, प्रदेशाध्यक्ष,अ.भा.भो.स.से.संस्था नानासाहेब लकारे, महाराष्ट्र समन्वयक, अ.भा.भो.स.से. संस्था, रविंद्र शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख, चंद्रपूर, नितीन मत्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख, वरोरा-चंद्रपूर, दामोधरजी रूयारकर, संचालक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तथा अध्यक्ष भोई समाजसेवा संस्था, वरोरा,सविताताई डाहे, महिला प्रदेशाध्यक्ष, अ.भा.भो.स.से. संस्था, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.चेतन खुटेमाटे,सामाजिक कार्यकर्ते शंभूनाथ वरघने हे प्रामुख्याने उपस्थित राहतील तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भअध्यक्षा अल्का पचारे,शिल्पा रूयारकर, रंगनाथ पवार, रीया पचारे, संदीप मोरे, प्रेमिला रूयारकर, स्नेहा करलूके, नीशिका पचारे, रिना मोरे, अमोल तुमसरे, किरण नागपुरे यांनी केले आहे.