अल्का पचारे यांच्या अथक प्रयत्नाने झालेल्या या कार्यक्रमात गुणवंताचा व पत्रकारांचा सत्कार. अनेक मान्यवरांची उपस्थिती.
वरोरा :-
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय समाज मेळावा व गुणवंतांचा तथा पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा २१ जून २०२५ ला नगर भवन वरोरा येथे सूसंपन्न झाला.
कार्यक्रमाला अ .भा.भो.स.से.संस्था राष्ट्रीय महासचिव गजानन साटोटे,राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ काटकर,प्रदेशाध्यक्ष तुकाराम वानखेडे, महाराष्ट्र समन्वयक नानाजी लकारे, महाराष्ट्र उपाध्यक्ष पांडुरंग गलपवाड,महिला प्रदेशाध्यक्ष सविता डाहे, विदर्भ अध्यक्ष अल्का पचारे, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दामोधर रुयारकर, उद्योजक शंभूनाथ वरघणे,जिल्हाध्यक्ष शिल्पा रूयारकर,नंदू पढाल, आत्माराम म्हात्रे, पंकज सोनोने,विनोद पोइनकर,अनिता लाडे,चंद्रकांत लाडे,संदीप मोरे, रंगनाथ पवार,निशिका पचारे, प्रेमिला रुयारकर,रिया पचारे,किरण नागपुरे,योगेश पचारे,शुभम काकडे, रिना मोरे,कुणाल रुयारकर, लोकेश रुयारकर,प्रगती रुयारकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन साटोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना म्हणाले की समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी समाज संघटित असणे आवश्यक आहे.महिलांच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी तसेच युवापिढीसाठी रोजगार मिळावा.यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील आहों.संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा झाली असून ते भोई समाजाच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याचे प्रतिपादन साटोटे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे माध्यमातून समाजबांधवांच्या एकजुटीचे चित्र सभागृहात दिसून आले. जवळपास २०० समाजबांधवांनी कार्यक्रमात उपस्थिती लावली.कार्यक्रमाचे औचित्य म्हणजे विद्यार्थ्यांचा गुणगौरव ,पत्रकार बांधवांच्या लेखणीचा गौरव, यथोचित सन्मान,सत्कार आयोजक विदर्भ अध्यक्ष अल्का पचारे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला.
कार्यक्रमाचे माध्यमातून समाज बंधू भगिनिमध्ये एकात्मता ,समर्पण आणि समाजहिताच्या कार्यासाठी प्रेरणा मिळाली.अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था अशाच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजोन्नतीसाठी कार्य करीत राहणार अशी प्रतिक्रिया विदर्भ अध्यक्ष अल्का पचारे यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्का पचारे यांनी केले.कार्यक्रमात तुकाराम वानखेडे,नानाजी लकारे,सविता डाहे ,शंभूनाथ वरघने,नंदू पढाल आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन रिया पचारे व संदीप मोरे यांनी केले.