तालुक्यात बैल पोळा सण आवागावात उत्सवात साजरा त शेतकऱ्यांनी बैल सजवून पोळ्यात लावली हजेरी..
वरोरा.टेमुर्डा प्रतिनिधी.धनराज मा बाटबरवे मो.7498923172
शेतकऱ्यांच्या कष्टाला जोड कुणाची असतें तर ते बैल आहे आणि दरवर्षी त्या बैलाची पोळ्याला वेगळी नवलाई असतें, कुणी बैल पोळ्यात वेगवेगळे रंग भरून बैलाला सजवीतात तर कुणी परंपरागत पद्धतीने त्यांच्यावर घुंगरू खाल टाकून तोऱ्यात बैल जोडी पोळ्यात आणतात, दरम्यान वरोरा तालुक्यातील मोवाडा आणि टेमर्डा येथील बैल पोळ्याचा उत्सव अतिशय देखणा होता, २२ ऑगस्ट २०२५ रोज शुक्रवारला बैल पोळा हा सण टेमुर्डा मोवाडा या गावात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे.
श्रावण अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या या सणात शेतकरी आपल्या मेहनतीच्या साथीदार असलेल्या बैलांना सजवून पूजा करतात व त्यांना या दिवशी विश्रांती दिल्या जाते, श्रावण अमावस्या (ज्याला स्थानिक पिठोरी अमावस्या म्हणूनही संबोधले जाते) या पवित्र दिवशी शेतकरी वर्ग आपल्या बैलांसमोर कृतज्ञतेचा उत्सव साजरा करतो. त्यालाच बैल पोळा असे म्हणतात यंदा शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी ( मोवाडा टेमुर्डा गावात ) बैल पोळा हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला आहे.
हा सण विशेषता ग्रामीण भागात आजही बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शेतकरी या दिवशी बैलांना विश्रांती देतात, त्यांच्या खांद्याला ढवून (खांद शेकणे) हळद व तुप लावून पूजा करतात, सुंदर झूल, शाल, माळ, इत्यादींनी सजवितात. शिंगांना रंग लावले जातात आणि घरगटात खास गोड पदार्थांची अर्पण होते, . पुरणपोळी, ठोंबरा, इत्यादी
स्थानिक परंपरा..
बैल पोळा हा खूप मोठ्या थाटात दोन दिवसांचे—मोठा पोळा (प्रथम दिवस) व तन्हा पोळा (दुसरा दिवस) साजरे केले जातात. दुसऱ्या दिवशी मुलं लाकडी बैल सजवून घरोघरी फेरी करतात आणि त्यांना पैसे किंवा भेटवस्तू दिल्या जातात.
यावेळी गावात मारुती देवळासमोर तोरण बांधला जातो, पारंपरिक बैलपोळ्याच्या दिवसी गाणी गातात आणि बैलांची मिरवणूक निघते. वाजे-ताशे, सनई, ढोलगोळा या पारंपरिक वाद्यांनी सणाचा रंग चढविला जातो. सर्व बैलांची मोवाडा गावात यात्रा भरवली गेली. प्रमुखांकडून यांची पूजा केल्यांनतर ही बैल आप-आपल्या घराकडे पळत सुटतात. या दरम्यान बैलांना घरोघरी गृहिणींकडून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जाते.
बैल पोळ्यामागील पौराणिक कथा.
या सणामागे एक मनोरंजक पौराणिक कथा आहे. असे मानले जाते की, एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते. पार्वती जिंकली असतानाही शंकराने ‘मी जिंकलो’ असा दावा केला. तेव्हा त्यांनी नंदीला साक्षीदार मानले. त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली. यामुळे पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला की, ‘मृत्यूलोकात तुझ्या मानेवर जु (जोखड) बसेल आणि तुला जन्मभर कष्ट होतील.’नंदीला आपली चूक कळल्यावर त्याने पार्वतीकडे क्षमा मागितली. तेव्हा पार्वतीला त्याची दया आली आणि तिने त्याला उःशाप दिला. ती म्हणाली, ‘वर्षातून एकदा शेतकरी तुझी देवता मानून पूजा करतील. त्या दिवशी तुझ्या मानेवर जु ठेवणार नाहीत.’ तेव्हापासून शेतकरी हा सण साजरा करत आहेत.