लॉक डाऊन च्या काळात सर्व लॉज बंद असतांना उदय लॉज पोलिसांचे बनले रेस्ट हाऊस, प्रेमी युगल यांना पर्वणी ?
भद्रावती :-
भद्रावती पोलीस प्रशासन हे अवैध व्यावसायिकांना पाठबळ देणारे माहेरघर असल्याची गंभीर बाब आता उघड झाली आहे. कारण दारू किंग नागो हा मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध दारू विक्री करीत असताना सुद्धा व इतर वार्डात दारू विक्रीचे ठिकाण जाहीर असताना पोलीस प्रशासन नेमक्या कुठल्या बिळात झोपले ? हा प्रश्न असून आता तर चक्क उदय लॉजवर भद्रावती पोलिसांनी रेस्ट हाऊस बनविले असल्याचे चित्र दिसत आहे. महत्वाची बाब म्हणजे या उदय लॉज मधे वय वर्ष १६ पासून तर ६० वर्षापर्यंत प्रेमी यूगल पोलिसांच्या देखरेखीखाली मुक्त संचार करीत असून प्रेमी युगलाना उदय लॉज पर्वणी ठरत आहे.
एकीकडे शहरातील सर्व लॉज आणि मोठी हॉटेल बंद आहे तिथे पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या उपस्थितीत उदय लॉज सुरू आहे आणि पोलिसांच्या उपस्थितीत नेहमीच प्रेमी यूगल इथे वावरत आहे, याचा अर्थ पोलीस संरक्षणात या लॉज मधे प्रेमी यूगल यांच्याकडून १ तास, २ तास, ३ तास अशा वेळेनुसार लॉज चे दर लावल्या जात असून दररोज इथे किमान २० ते २५ जोडपे आपल्या प्रेमाचा यथेच्छ आनंद लुटत असल्याने या लॉज चा व्यवसाय लॉक डाऊन च्या काळात सुद्धा जोमात झाल्याची माहिती आहे, विशेष बाब म्हणजे या उदय लॉज वर दारू आणून देणारे एका नंबर प्लेट नसलेल्या मोपेड गाडीवरून येतात अशीही माहिती आहे.
भद्रावती पोलिसांच्या अवैध दारू व्यवसायिक यांना पाठबळ देणाऱ्या अनेक कहाण्या चर्चील्या जात असताना काही दिवसापूर्वी भद्रावती पोलिसांनी अख्तर नावाच्या एका दारू माफिया ची 20 पेट्या देशी दारू पकडली होती मात्र अख्तर चे त्या दारूच्या गुन्ह्यात (एफआईआर) नाव न टाकता त्याला सोडले असल्याची नवी कहाणी सुद्धा जोडली गेली आहे. अर्थात पोलीस प्रशासनासोबत मधुर सबंध ठेवणाऱ्या दारू किंग नागो सोबतच अनेक अवैध दारू विक्रेते सद्ध्या बिनधास्त असून उदय लॉज संचालक सुद्धा मदमस्त असल्याची माहिती असल्याने पोलिसांच्या “सदरक्षणाय खलनिग्रहनाय”. या पोलिस ब्रीद वाक्याला हड़ताळ फासले गेल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक यांची भूमिका संदिग्ध असून भद्रावती येथील सुज्ञ नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचा विरोध दर्शवला आहे.