मनसेच्या सदस्य नोंदणीला प्रचंड प्रतिसाद, युवा कार्यकर्त्यांत जोश.
भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-
“भारत स्वतंत्र व्हायच्या १२ वर्षे आधीचा जन्म आहे माझा!” असा बाबांनी शब्दोच्चार काढताच उपस्थित नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह मनसे पदाधिकारी यांच्या अंगावर जणू शहारे आले आणि त्यांना अभिमान वाटला की आम्ही ‘राज ठाकरे’ नावाच्या योग्य माणसाबरोबर योग्य दिशेने वाटचाल करीत आहोत. कारण आता राजकीय पक्ष म्हटलं की संधिसाधु यांची जमा झालेली टोळी आणि त्यामुळे त्यांच्यावर चा विश्वास आता उठायला लागला असतांना एका ८३ वर्षीय आजोबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सदस्य होण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे समोर यावे म्हणजे आता महाराष्ट्रातील जनतेला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडून किती अपेक्षा असेल? हे स्पष्ट होते.
नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनेक ठिकाणी सदस्य नोंदणी सुरू असताना शहर अध्यक्ष गजानन काळे हे त्या सर्व ठिकाणी भेटी देत होते , त्यातील तुर्भे या ठिकाणी ते गेल्यावर एक वृद्ध आजोबा लगबगीने आधार कार्ड घेऊन थरथरत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी तंबू जवळ येऊन स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते, ते जमलेल्या महाराष्ट्र सैनिकांना म्हणाले, “थोडा वेळ थांबा मी झेरॉक्स काढून आणतो ह्या आधार कार्डची ” त्यांना वाटले की राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक होण्यासाठी आधार कार्ड ची आवश्यकता आहे. मग उपस्थित मनसे पदाधिकारी यांनी त्यांना म्हणाले की ‘बाबा आधार कार्ड लागणार नाही, या इकडे तुमची आम्ही मनसे सदस्य नोंदणी करुन घेतो. असं म्हणताच बाबांच्या चेहर्यावर एक प्रकारचं स्मित हास्य उमटलं आणि त्यांना राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक झाल्याचा आनंद वाटला!
खरोखरच राजसाहेब ठाकरें यांनी ते वाक्य म्हटलं होत की “ह्या पुढची वाटचाल खडतर असली तरी ठाम आहे, एक गोष्ट निश्चित कुठे जायचंय हे माहितय आणि जिथे जायचयं त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना नेणारच हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे!” आणि आता त्या विश्वासावर तरुणतुर्क मंडळीसह म्हाताऱ्यांना सुद्धा मनसेचा सदस्य व्हायची आवड निर्माण होत आहे त्यामुळे भविष्यात मनसेला सोनेरी दिवस नक्कीच येतील असा आशावाद महाराष्ट्र सैनिकांमधे निर्माण झाला असल्याचे दिसत आहे.