सन १९९३ मधील एका फोटोतील कहाणी आज त्याचे जिवंत उदाहरण ठरताहेत.
मार्मिक :-
आज जगात कोरोना संकट काळात सगळ्या देशातील लोक एकमेकांना मदतीचा हात देतांना दिसत असले तरी या कोरोना च्या संकट काळात भारतात मात्र काही डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स चे संचालक, अम्बुलंस संचालक (मालक). स्मशानभूमीत लाकडे विकणारे शिवाय लॉक डाऊन चा फायदा घेत फळे भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू विकणारे दुकानदार हे कोरोना पीडितांना व सर्वसामान्य जनतेला लुटतच आहे. डॉक्टर्स कोरोना च्या नावाखाली लाखों रुपयाचे बिल रुग्णांच्या नातेवाइकांना देऊन त्यांच्या खिशात दरोडा टाकताहेत तर ऑक्सिजन तुटवड्यामुळे संधी साधून काही संधीसाधू व्यापारी चढ्या दराने व्यापार करीत आहे. रेमडिसिविर,ऑक्सिमीटर व इतर औषधे विकणारे मेडिकल स्टोअर्सवाले चढ्या दराने हे साहित्य विकून रुग्णांच्या भावनांशी खेळत आहे. तर कोरोना च्या व्हायरस ने मेलेल्या लोकांना जाळण्याचा ठेका मिळालेल्या कंत्राटदाराला एका प्रेतांचे तब्बल २५ हजार रुपये मिळत असल्याने ते मालामाल होत आहे. अर्थात कोरोना काळात काही सामाजिक दायित्व जपणारे समाजसेवी मदत करीत आहे तर तर काही गिधाडे बनून लोकांना कोरोना बीमारी होण्याची वाट बघितली जात आहे.
आफ्रिकन फोटोग्राफर केविन कार्टर यांनी का केली आत्महत्या?
आपल्याला सन १९९३ मधील दक्षिण आफ्रिका देशातील त्या फोटोची कदाचित आठवण झाली असेल. एका आफ्रिकन फोटोग्राफर केविन कार्टर यांनी एक चित्र रेखाटले होते त्यात त्यांनी भुकेने तडफडत असलेली छोटी मुलगी आणि ती केव्हां मरेल याची वाट पाहत एक गिधाड असे चित्र रेखाटले होते त्यांच्या त्या चित्राची दखल घेवून आफ्रिकन सरकारने देशातील एका नामांकित स्पर्धा पुरस्काराचा त्याला विजेता घोषित केले होते. दरम्यान त्याला एका व्यक्तीने त्याचा हा फोटो बघून फोन केला की आपण जो फोटो काढला त्यात किती गिधाडे होती? त्या प्रश्नाचे उत्तर देतांना फोटोग्राफर केविन कार्टर यांनी सांगितले की तिथे फक्त एक गिधाड होते त्यावर समोरच्या व्यक्तीने सांगितले की नाही तिथे दोन गिधाडे होती त्यापैकी एक कैमेराच्या मागे होते तर दुसरे कैमेराच्या पुढे होते. अर्थात फोटोग्राफर केविन कार्टर यांच्या ही बाब पटकन लक्षात आली कारण जर त्यांनी फोटो काढण्या पेक्षा त्या लहान मुलीला एका सरक्षण ग्रूहात नेले असते किंव्हा तिला जेवण दिले असते तर तिचे प्राण वाचले असते. त्यामुळे आपल्या हातून अक्षम्य चूक झाल्याचा पच्छताप झाल्याने अवघ्या ३३ व्या वर्षीफोटोग्राफर केविन कार्टर यांनी आत्महत्या केली.
आज देशात केंद्रात बसलेले मोदी सरकार ज्यांची जबाबदारी आहे की जनतेला त्यांच्या मूलभूत गरजा पुरवणे पण हे सरकार व्यापार करतांना दिसत असून कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढवून गिधाडाच्या भूमिकेत आहे. त्यांना दुसऱ्या लाटेची आगोदरच माहीती असतांना त्याची पूर्व तयारी त्यांनी का केली नाही? रेमडिसिविर इंजेक्शन असो, ऑक्सिजन पुरवठा असो किंव्हा व्हेंटिलेटर्स असो एवढेच नव्हे तर कोरोना वैक्शीन असो त्याचा साठा आपल्याकडे न ठेवता ते साहित्य बाहेर देशात का पाठवले? याचे उत्तर मोदी सरकारकडे नाही त्यामुळे मोदी सरकार सुद्धा गिधाडाच्या भूमिकेत आहेत हे देशाचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
ज्या प्रकारे गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे अवशेष नोचण्यासाठी त्यांच्या मरणाची वाट बघत असते तसेच येथील आरोग्य व्यवस्थेत काम करणारे डॉक्टर्स नर्सेस व मेडिकल संचालक जेंव्हा त्यांच्याकडे रुग्ण जातात त्यावेळी त्या रुग्णांच्या बाबतीत ते गिधाडे बनून त्यांचे आर्थिक लचके तोडतात एवढेच नव्हे तर फळे भाजीपाला अम्बुलंस व्यवस्था यासाठी जणू रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः नाचवीतात. त्यामुळे कोरोना संकट काळात रुग्णांना मदत करण्यापेक्षा त्यांचे आर्थिक शोषण करण्यात डॉक्टर्स पहिल्या क्रमांकावर आहेत तर दुसरे मेडिकल स्टोअर्स संचालक आहेत. हे संधी साधून आहेत की कधी कुण्या व्यक्तीला कौरौना होतोय आणि कधी त्यांचे आर्थिक शोषण करतोय.
नुकताच नाशिक मधे एका रुग्णांच्या मुलाने बिल भरले नाही म्हणून डॉक्टर्स कडून त्या मुलाला तब्बल तीन दिवस डांबून ठेवले जाते. चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टर्स जादा बिल आकरून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करताहेत. सरकारतर्फे आलेली रेमडेसिविर इंजेक्शन तुटवड्याच्या नावाखाली खाजगी डॉक्टर्स व नर्सेस मोठ्या दराने विकतात.ऑक्सिजन सिलेंडर चा तुटवडा दाखवून चढ्या दराने विकणारे व्यापारी व एजंट हे सर्व गिधाडेच तर आहेत?
शिंदे परिवार व डॉ.गावतुरे यांचे उत्कृष्ट योगदान.
जिथे सरकारी खाजगी डॉक्टर्स कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांच्या खिशात दरोडा टाकत आहे, व लोकप्रतिनिधी जिथे बघ्यांची भूमिका घेत आहे तिथे भद्रावती येथील रवींद्र शिंदे व डॉक्टर शिंदे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कोरोना रुग्णांसाठी आपले स्वतःचे मंगल कार्यालय कोविड सेंटर साठी देऊन तिथे विनामूल्य जेवण व इतर आवश्यक चा पुरवठा करताहेत तर दुसरीकडे डॉ गावतुरे दांपत्य यांनी कोरोना रुग्णांचे मोफत उपचार व मार्गदर्शन करीत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना रुग्णांसाठी काही डॉक्टर्स, मेडिकल स्टोअर्स व अम्बुलंस वाले गिधाडे बनले आहे तर दुसरीकडे शिंदे परिवार व डॉ. गावतुरे दांपत्य कोरोना रुग्णांसाठी देवदूत बनले आहे, पण त्या गिधाडांना कोण समजविणार?