कृषी विभागाची बियाणे उगवणवक्ती तपासणी मोहीम जोरात.
खांबाडा मनोहर खिरटकर:-
लाँकडाउनमध्ये सर्व अर्थचक्र थांबले परंतु शेतीव्यवसाय मात्र सुरू राहिला परंतु मागील वर्षी बियाणे दर्जेदार मिळाली नसल्याने उत्पादन कमी झाले त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या विंवचेनेत सापडला, आता सोयाबीन बियाण्याचे वाढलेले दर त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला. अशातच यंदाच्या खरिप हंगामात पेरणी कशी करावी असा गंभीर प्रश्न तयार झाला असताना खरिप हंगामात सोयाबीन पेरणी करीता घरचेच बियाणे उगवण क्षमता तपासून कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
सोयाबीन बियाण्याचे वाढलेले दर शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावणारे असल्याने कृषी विभागाने खांबाडा, टेमुर्डा परिसरात सोयाबीन ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविल्यामुळे शेतकऱ्यांकडे घरचेच उत्तम दर्जाचे बियाणे तयार झाले त्यामुळे खरिप हंगामात सोयाबीन बियाणे उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी राहिल व वाढलेले दर यांचा अंदाज घेऊन तालुका कृषी अधिकारी वरोरा यांच्या अधिनस्त सर्व कृषी सहायकानी संपूर्ण तालुक्यात मोहिम राबवून शास्त्रीय पद्धतीने खरिप, रब्बी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनाकडून चांगल्या दर्जाचे बियाणे उत्पादित करून घेतले व शास्त्रशुध्द पध्दतीने साठवणूक केली त्यात खांबाला टेमुर्डा परिसरात शास्त्रीय पद्धतीने उत्पादित केलेले अंदाजे वजन आठशे क्लिंटल बियाणे शेतकऱ्यांकडे पेरणी करिता उपलब्ध आहेत बियाण्याची उगवण क्षमता तपासणी मोहीम कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडल कृषी अधिकारी यांच्या मदतीने संपूर्ण परिसरात जोरात सुरू केली, कृषी विभागाचे कर्मचारी गावोगावी भेटी देवून शेतकऱ्यांना घरचेच बियाणे उगवणशक्ती तपासण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवित आहेत, तालुका कृषी अधिकारी यांच्या अधिनस्त कृषी कर्मचारी सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम राबविले व शेतकऱ्यांकडे घरचेच उत्तम बियाणे तयार झाले त्यामुळे परिसरातील शेतकरी कृषी विभागाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत असल्याचा सुर दिसत आहे.
प्रतिक्रिया……
येत्या खरिप हंगामात सोयाबीन बियाणे तुटवडा निर्माण होण्याचाअंदाज असल्याने आमच्या चमुसह आम्ही शेतकऱ्यांकडून शास्त्रीय पद्धतीने जवळपास आठशे क्किंटल सोयाबीन बियाणे तयार करून घेतले, बियाणे कंपनीकडे जाणारे शेतकऱ्यांचे लाखो रूपये वाचविले आणि गावातच पेरणीकरीता बियाणे तयार झाले तेच बियाणे इतर शेतकऱ्यांना सुद्धा पेरणी करावी. सत्तर टक्केच्या पुढे उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी उत्तम आहे.प्रात्याक्षिक दाखवताना मंडळ कृषी अधिकारी किशोर डो़गरकर, कृषी सहायक चवरे व उपस्थित शेतकरी.
किशोर डोगरकर मंडळ कृषी अधिकारी वरोरा