एका महिला पोलीस कर्मचारी हिला मारहाण, धमकी व तिचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायालयातून गुन्हा दाखल.
पोलिस पंचनामा :-
“सदरक्षनाय खलनिग्रहनाय” ह्या पोलीस ब्रीद वाक्याला हडताळ फासल्याने व शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस कर्मचारी हिला त्रास देत मारहाण केल्याच्या आरोपावरून सहायक फौजदारासह चार पोलिसांवर न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात एका 35 वर्षांच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दाखल केली होती.पण पोलीस स्टेशन मधे तक्रार घेतली नसल्याने त्या महिला पोलीस कर्मचारी हिने न्यायालयात धाव घेतली त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने सहायक फौजदार रत्नकांत इंगळे, रसिका चव्हाण, कुसुम मोरे आणि अश्विनी कुदळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये राहण्यास आहेत. त्यांना घरातून हालकून लावण्याच्या उद्देशाने आरोपींनी त्यांच्या विरोधात खोटा अर्ज केला. त्यानंतर आरोपी इंगळे यांनी तक्रारदार यांना फोन करून तुझा अर्ज आला आहे, असे म्हणत अश्लील बोलत विनयभंग केला. तसेच, त्यानंतर इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना त्रास दिला. तसेच, त्यांनी केलेली तक्रार मागे घेण्यासाठी घरात घुसून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, आरोपी इंगळे सोबत बोलणे झालेली तक्रारदार यांनी तयार केलेली सीडी आरोपींनी फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी महिला पोलीस शिपाई यांची पोलीस ठाण्यात तक्रार घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. यामध्ये सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चौघांच्या विरोधात विनयभंग, मारहाण करणे, धमकाविणे अशा विविध कमलानुसार गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.