Home गडचांदूर खळबळजनक :-मनिकगढ कंपनी गेट जवळ मृत कामगारांचे प्रेत ठेवल्याने खळबळ.

खळबळजनक :-मनिकगढ कंपनी गेट जवळ मृत कामगारांचे प्रेत ठेवल्याने खळबळ.

तब्बल 10 तासाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कंपनी ने मृतकांच्या नातेवाईकाना 750000/- रुपये नुकसान भरपाई केली मंजूर.

गडचाँदुर प्रतिनिधी :-

मनिकगड सिमेंट कंपनी मधे आज दुपारी 12 च्या दरम्यान प्रकाश पवार नामक 48 वर्षीय कामगाराचा आकस्मिक मृत्यु झाल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांनी कंपनी गेट समोर मोठी गर्दी केली व पोस्टमार्टम झाल्यानंतर कामगारांचे प्रेत कंपनी गेट समोर ठेऊन आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचे नेत्रूत्व सामजिक कार्यकर्ते राजेश भौगेकर नगराध्यक्ष सविता टेकाम शरद जोगी विक्रम येरणे सचिन भोयर राजू चौधरी यांनी केले. त्यांची मागणी होती की मृतकाच्या कुटुंबीयांना 10 लाख तत्काळ आर्थिक मदत व पत्नीला नौकरी परंतु तब्बल 10 तासापासुन मृतदेह कंपनी गेट समोर ठेवण्यात आला. व अखेर 750000/-रुपये नगदी व उर्वरित इन्शुरन्स चे पैसे नंतर देण्याचे ठरल्याने यावर तोडगा निघून मृतदेह रात्री 10.30 ला घरी नेण्यात आला.

मनिकगड सिमेंट कंपनीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून त्यांना किमान वेतन देण्यात येत नाही काही स्थानिक कामगार आहेत त्यांना पूर्ण 26 दिवस काम देण्यात येत नाही शिवाय कामगारांच्या सुरक्षा संदर्भात उपाययोजना कंपनी व्यवस्थापन करताना दिसत नसल्याची ओरड होतं असताना आता प्रकाश पवार नामक कामगाराचा दुर्दैवी मृत्यु दुपारी बारा वाजता मनिकगड कंपनीत झाल्यानंतर म्रूतक कुटुंब व गडचाँदुर परीसततील राजकीय सामाजिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला म्रूतक यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व त्याच्या पत्नीला कंपनीत नौकरी देण्याची मागणी केली परंतु या मागणीवर कंपनी व्यवस्थापना ने कुठलाही निर्णय न घेतल्याने तब्बल 10 तासानंतर सुद्धा कामगाराचा मृतदेह कंपनी गेट समोर अजूनही ठेवला असल्याने कंपनी व्यवस्थापणा विषयी आक्रोश व्यक्त केल्या जात आहे.

या घटनेनंतर गडचाँदुर परिसरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेत्यानी एकत्र येऊन जोपर्यंत म्रूतक प्रकाश पवार यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत दिल्या जात नाही तोपर्यंत मृतदेह कंपनी गेट समोरून हटविनार नाही असा पवित्रा घेतल्याने कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले असल्याने शेवटी तोडगा काढण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here