
वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील या दुर्दैवी घटनेने समाजमन हळहळले !
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहरालगत नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या व बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शालिमार ट्रेडर्सच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या कांबळे कुटुंबियातील मिष्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष व अस्मिन संजय कांबळे वय 5 वर्ष या दोन मुलांची विष पाजून त्यांच्या जन्मदात्या पित्यानेच ( संजय श्रीराम काबळे वय अंदाजे 40) हत्त्या केल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान आज सकाळी गिरड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या साखरा मंगरूळ रोड च्या एका शेतात पित्याने सुद्धा आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
संजय कंबळे हा सुशिक्षित असून बेरोजगारी ने त्रस्त झाला असल्याची चर्चा आहे व त्यांच्या पत्नीच्या पोलीस स्टेशन येथील तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आपण मुलांचे भविष्य बनवू शकत नाही त्यामुळे यांना संपवून टाकण्याची भाषा हत्त्या करणाऱ्या पित्याने अगोदरच केली होती दरम्यान मागील काही महिन्यांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे कळते. पत्नी सविता डी फार्म कॉलेज मध्ये लॅब अटेंडट म्हणून काम करत होती.घटनेच्या दिवशी मुलगा अस्मिन हा बोर्डा येथील रहिवासी आजोबा यांच्याकडे राहत होता. काल दुपारच्या सुमारास वडील संजय मुलाला घेऊन त्याचे किरायाने असलेल्या शालिमार ट्रेडर्स च्या मागील वसाहतीत घेऊन गेला.आजीलाही वडील मुलाला घेऊन गेल्याने खाऊ घेऊन परत आणून सोडतील या आशेने दुर्लक्ष केले. मात्र घरी नेताच संजय ने मुलगी मिष्ट्री आणि अस्मिन याला विषारी द्रव्य पाजल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तर अस्मिन यांच्या गळ्याभोवती व पाठीवर मारल्याच्या खुणा असल्याने विष पाजल्यावर अस्मिन च्या गळ्याखाली विषयुक्त द्रव्य उतरावे यासाठी प्रयत्न करतान्याच्या खुणा प्रथम दर्शी दिसून येत आहे.संजय हा समुद्रपूर तालुक्यातील कोरा साखरा येथील मूळ रहिवासी असून दोन वर्षांपासून च्या झालेल्या कोरोणा काळामध्ये ट्युशन बंद पडल्याने त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने त्याने हा प्रकार केला तर नसावा ना किंवा पती पत्नीच्या कौटुंबीक वादातुन या निरागस मुलांची हत्या घडून आली असावी असाही तर्क लावल्या जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वरोरा तालुक्यात या निरागस मुलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
आरोपी संजय कांबळे याचीही आत्महत्या ?
पोलीस आरोपी संजय कांबळे याचा कसून शोध घेत असतांना आज साखरा मंगरूळ रोड च्या एका शेतात त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान काल उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी ,पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे ,सहायक पोलीस निरीक्षक निलेश चवरे ,पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार ,गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी धनराज करकाडे हे रुग्णालयात दाखल झाले होते व या निरागस मुलांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे ठोस निदान लागावे म्हणून शव विच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. आज काही शेतकऱ्यांना साखरा मंगरूळ रोड च्या एका शेतात त्याचे प्रेत दिसल्याने पोलीस याचा पुढील तपास घेत आहे.